नागपूर : या देशात महात्मा गांधीजी यांच्यावर चित्रपट तयार होऊ शकतो आणि त्यासाठी सरकार निधी देऊ शकते, मग या देशात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही चित्रपट होऊ शकतो. हा चित्रपट करण्यामागे आहे देखील एक कारण होते, असे अभिनेता रणदीप हुड्डा म्हणाला.

सावरकरांविषयी अधिक माहिती..

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणे सोपे नव्हते, त्यांच्याविषयी वाचन करीत अधिक माहिती घेतल्यानंतर संपूर्ण जगाला स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर माहिती व्हावे याकरिता या चित्रपटात त्यांची भूमिका साकारली, असे शअभिनेता रणदीप हुड्डा म्हणाले. त्यासाठी सावरकरांवरील पुस्तके विकत घेतली, ती वाचून काढली यावेळी उपस्थित युवकांसोबत संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनसोक्तपणे उत्तरे दिली.

सुरुवातीला मी नाकारले होते..

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची भूमिका सुरुवातीला नाकारली होती. मात्र, त्यांच्याविषयी एक पुस्तक वाचण्यात आल्यानंतर अधिक माहिती जाणून घेतली. आपणास केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती, एवढेच आपण पुस्तकात वाचले आहे. महाराष्ट्राला स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती होते. मात्र, इतर राज्य, संपूर्ण देश आणि विश्वाला त्यांच्याविषयी माहिती व्हावी यामुळे ही भूमिका स्वीकारली.

सावरकरांचे व्यक्तिमत्व उत्तुंग

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्याकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर काय विचार करीत होते आणि सद्यस्थितीत त्या विचाराचे अपेक्षित असलेले परिणाम याची सांगड घालत चित्रपटातील कथानकावर अधिक भर देण्यात आला.‌ लोकांना शिक्षित करण्यासाठी या चित्रपटात कार्य केले असून स्वातंत्र्यवीर सावरकर समजणे सोपे नाही, असे अभिनेता रणदीप हुड्डा म्हणाला. मी खूप बायोपिक्स केल्या आणि कलावंत म्हणून मी त्यांना समजण्याचा प्रयत्न करतो., असेही तो म्हणाला.

नेहरूजींवर देखील चित्रपट होऊ शकतो

अभिनेता रणदीप हुड्डा २८ मार्च २०२६ रोजी नागपूर फिल्म फेस्टिव्हलच्या (NFF २०२६) उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातील मुख्य भूमिका आणि दिग्दर्शनाबद्दल चर्चा केली. सावरकरांना त्यांच्या काळाच्या संदर्भात समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगत, त्यांनी या व्यक्तिरेखेसाठी घेतलेली अपार मेहनत आणि संशोधनावर प्रकाश टाकला. गांधीजींवर चित्रपट होऊ शकतो, मग सावरकरांवर का नाही म्हणून हा चित्रपट केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर देखील चित्रपट तयार होऊ शकतो, असे अभिनेता रणदीप हुड्डा म्हणाला.