scorecardresearch

नागपूर : वासनांध बापाचा सख्ख्या मुलीवर बलात्कार, राज्य महिला आयोगाने घेतली दखल

मुलगी शाळेतून आल्यानंतर कपडे बदलवित असताना सख्ख्या मुलीकडे बघून वासनांध बापाची नजर फिरली.

नागपूर : वासनांध बापाचा सख्ख्या मुलीवर बलात्कार, राज्य महिला आयोगाने घेतली दखल
( संग्रहित छायचित्र )

मुलगी शाळेतून आल्यानंतर कपडे बदलवित असताना सख्ख्या मुलीकडे बघून वासनांध बापाची नजर फिरली. दारुड्या बापाने नात्यागोत्यासह मुलीच्या वयाचाही विचार न करता मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला आईसह जीवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली असून आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामराव (काल्पनिक नाव) हा पत्नी व मुलगा व मुलीसह हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो काहीही कामधंदा करीत नसून त्याची पत्नी शेतमजुरी करते. मोठी मुलगी रिया (काल्पनिक नाव) १३ वर्षांची असून ती सातवीची विद्यार्थिनी आहे तर मुलगा १० वर्षांचा आहे. पत्नीच्या कमाईवर जगणाऱ्या रामरावला दारुचे व्यसन आहे. १ ऑगस्टला रिया शाळेतून आली आणि घरात कपडे बदलत होती. त्यावेळी दारुड्या नराधम बापाची विखारी नजर तिच्यावर पडली. त्याने मुलीला जवळ बोलवून तिच्याशी अश्लील चाळे केले. मात्र, मुलीने प्रतिकार करीत मैत्रिणीच्या घरी निघून गेली. ३ ऑगस्टला रामराव मुलीच्या शाळेत गेला आणि गावी जायचे असल्याचे सांगून घरी घेऊन आला.

दारुच्या नशेत असलेल्या रामरावने टीव्हीचा आवाज मोठा केला आणि मुलीशी अश्लील चाळे करू लागला. तिने प्रतिकार केला केल्यानंतर तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. रियाने आरडाओरड करीत आतून दरवाजा ठोठावला. परंतु, टीव्हीच्या आवाजामुळे शेजाऱ्यांना आवाज आला नाही. त्यामुळे मुलगी बापाच्या वासनेची बळी पडली. घडलेल्या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास आईसह जीवे मारण्याची धमकी मुलीला दिली. त्यामुळे मुलगी गप्प बसली. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलास अटक केली.

बापलेकीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना असून राज्य महिला आयोगाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी निर्देश देण्यात आले आहे, असे राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे म्हणाल्या.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rape of daughter by father took cognizance of state commission for women amy

ताज्या बातम्या