scorecardresearch

Premium

नागपूर : लॉजमध्ये प्रेयसीवर बलात्कार, अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी

फेसबुकवरून ओळखी झालेल्या युवकाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला मौद्यातील बालाजी लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

Rape of girlfriend in lodge
नागपूर : लॉजमध्ये प्रेयसीवर बलात्कार, अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : फेसबुकवरून ओळखी झालेल्या युवकाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला मौद्यातील बालाजी लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तरुणीचे अश्लील छायाचित्र काढून समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय टारजन मेश्राम (३४, शिवसुंदरनगर, दिघोरी) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा – टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, ६४ हजार उमेदवार पात्र; २० हजार जागांवर होणार शिक्षक भरती

delivery boy was robbed pune
पुणे : कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले
minor girl ran away from forest half-naked young man who tried to rape was arrested
मुलीने अर्धनग्नावस्थेत जंगलातून काढला पळ… बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अटक
murder pretending suicide pune husband wife crime
पुणे : पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव; खून करून तरुण पसार
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?

हेही वाचा – मुंबईसाठी ‘या’ दिवशी १४ विशेष रेल्वेगाड्या, कसे आहे नियोजन? जाणून घ्या…

पीडित ३५ वर्षीय तरुणी एका कंपनीत नोकरी करीत होती. तिची फेसबुकवरून अक्षयशी ओळख झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या सहा वर्षांपासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. २०१६ मध्ये अक्षयने तिला मौद्यातील उमरेड रोडवर असलेल्या बालाजी लॉजवर नेले. तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर तिला अश्लील छायाचित्र प्रसारमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. गेल्या काही दिवसांपासून तो तरुणीला टाळायला लागला होता. यादरम्यान, अक्षयच्या कुटुंबियांनी त्याच्या लग्नासाठी वधूशोध सुरु केले होते. याबाबत तरुणीला माहिती मिळाली. तिने लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे चिडलेल्या अक्षयने तिला लग्नास नकार दिला. तरुणीने मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अक्षय मेश्रामला अटक केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rape of girlfriend in lodge threats to viral obscene pictures adk 83 ssb

First published on: 27-11-2023 at 14:06 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×