वर्धा : वॉट्सॲपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा परिणाम शारीरिक अत्याचारावर बेतण्याचा दुर्दैवी प्रसंग एका महिलेवर ओढवला.

हेही वाचा – ताडोबा बफर झोनमध्ये पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृत्यू, वन खात्यात खळबळ

buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
drowned
साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या

हेही वाचा – वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता

समुद्रपूर तालुक्यातील एका गावातल्या चाळीस वर्षीय महिलेची सांगली जिल्ह्यातील अक्षय रमेश पवार या तीस वर्षीय युवकाशी ओळख झाली. एका वॉट्सॲप समुहावर हे दोघे एकत्रित आले होते. २०२१ च्या ओळखीतून जवळीक व पुढे मधुर संबंध वाढले. युवक तिला तिच्या घरून कोल्हापूरला नेत वेळोवेळी जबरी अत्याचार करीत होता, अशी पीडितेने तक्रार केली. पीडित महिलेने कोल्हापूर जिल्ह्यातील पेडवठगाव ठाण्यात प्रथम तक्रार दिली होती. मात्र घटनास्थळ समुद्रपूर तालुक्यातील असल्याने गुन्ह्याची नोंद समुद्रपूर ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार प्रकाश काळे यांनी दिली आहे.