अखेर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने अधिसभा ( सिनेट) निवडणूक पुढे ढकलली आहे. विद्यापीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे ११ डिसेंबरला निवडणूक घेऊ शकत नाही असे न्यायालयाला सांगितले.या याचिकेवर १४ डिसेंबरला न्यायालय निर्णय देणारआहे.तयारी पूर्ण न झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवल्याने शैक्षणिक वर्तुळात प्रशासनावर टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>“नागपूर-हैदराबादला जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करा”, मुनगंटीवारांची केंद्र सरकारकडे मागणी

मतदार याद्यांमध्ये चुका असल्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माजी अधिसभा सदस्य प्राध्यापक प्रशांत डेकाटे यांनी दाखल केली. सात डिसेंबरला यावर सुनावणी झाली. यावेळी विद्यापीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असल्याने ११ डिसेंबरला निवडणूक घेण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे आता निवडणूक पुढे जाणार हे निश्चित झाले आहे. १४ डिसेंबर ला न्यायालय या याचिकेवर निर्णय देणार आहे. न्यायालयाने मतदार यादीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले तर निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj nagpur university administration has proceeded with the senate election dag 87 amy
First published on: 07-12-2022 at 18:54 IST