भारतात श्रीरामाचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होते. परंतु, एका ठिकाणी रावणाची सद्गुणांमुळे पूजा होते हे सांगितले तर खरे वाटणार नाही. मात्र, हे सत्य असून, अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते. या प्रथेला तब्बल २१० वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे.वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. दशानन रावणात काही चांगले गुणही होते. याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात करण्यात येते. बाळापूर तालुक्यातील वाडेगावनजीक हे गाव आहे.

हेही वाचा >>> वाशिम : शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून ५० ‘एसटी बसेस’ जाणार , प्रवाशांना मात्र मन:स्ताप

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
three year old boy dies after balloon gets stuck in throat in Ichhalkaranji
फुगा घशात गेल्याने चिमुकल्याच्या मृत्यू; इचलकरंजीतील घटना

गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन मूर्ती आहे. उघड्यावर ही मूर्ती वसलेली आहे. हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धस्थानही आहे. रावण या गावाचे दैवत असून ही मूर्ती स्थापन केल्यापासून गावावरील संकटे दूर झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.रावणाच्या स्वभावातील काही दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील अनेक गुणांचे दर्शन होते. तपस्वी, बुद्धीमान, शक्तिशाली, वेदाभ्यासी आदी गुणांमुळेच सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. २१० वर्षांपूर्वी या भागात वास्तव्य असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिम असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती. त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होते. आजही त्यातील काही उपक्रम सुरू आहेत. ऋषी ब्रह्मालीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनवण्याचे काम सोपवण्यात आले. पण, त्याच्या हातून दशानन रावणाची मूर्ती घडली. दहा तोंडे, काचा बसवलेले २० डोळे, सर्व आयुधे असलेले २० हात, अशी विराट मूर्ती या मूर्तिकाराने घडवली. दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती, हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले. भक्तिभावाने रावणाची पूजा केली जाते. दसऱ्यानिमित्त सर्वत्र रावणाचे दहन होत असतांना या गावात मात्र विशेष पुजा होते. गावात रावणाचे भव्य मंदिर बांधले जावे, अशी आता ग्रामस्थांची इच्छा आहे.

अकोला जिल्ह्यातील सांगोळा येथे सद्गुणांमुळे रावणाची पूजा करण्यात येते. या ठिकाणचे मंदिर राज्यातील एकमेव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विदर्भातील काही आदिवासी भागात देखील रावणाला पूजले जाते.