नागपूर : महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेची (एमएचटी-सीईटी) नोंदणी प्रक्रिया ११ मे रोजी संपली असून राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ६ लाख ४ हजार ८७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या नोंदणीत एक लाखाने वाढ झाल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेश वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एमएचटी-सीईटी’ नोंदणीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांना सुदिन येण्याची आशा आहे. यावर्षी झालेल्या नोंदणीत मुंबई, पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील नोंदणीचा वाटा सर्वाधिक आहे.  तज्ज्ञांच्या मते, करोना महासाथीनंतर शैक्षणिक क्षेत्रातील परिस्थिती पुन्हा एकदा सुधारत आहे. त्यामुळे प्रवेशामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषत: शेजारच्या राज्यांतील विद्यार्थ्यांची नोंदणी यंदा वाढली आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record registration mht cet increase engineering admissions this year ysh
First published on: 18-05-2022 at 01:01 IST