scorecardresearch

Premium

कोणतीही परिक्षा नाही, थेट निवड! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांची भरती, आजच अर्ज करा..

महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या महा-आयटी (एमआयटीसी) म्हणजे म्हणजेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे.

Recruitment mitc
कोणतीही परिक्षा नाही, थेट निवड! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांची भरती, आजच अर्ज करा.. (image – pixabay/representational image)

नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या महा-आयटी (एमआयटीसी) म्हणजे म्हणजेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे. या भरतीअंतर्गत विविध विभागांतील रिक्त पदे भरली जाणार असून थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत वित्त अधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ खाते कार्यकारी या पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखत २६ सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.

Academic Bank of Credit website
‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ संकेतस्थळावरील विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्राची आघाडी, देशभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
Rajnish Seth as Chairman of MPSC
रजनीश सेठ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी
job
कंत्राटी नोकर भरतीमुळे युवकांचे शोषण! २.५ लाख रिक्त पदे केव्हा भरणार?
mpsc
एमपीएससीचा लिपीक व टंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर; उमेदवारांना सुखद धक्का

हेही वाचा – चंद्रपूर : अरबिंदो रियल्टी कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

हेही वाचा – पोलीस दादा, गणवेशात नको ना नाचू, पोलीस महासंचालकांचे काय आहे आदेश वाचा…

शैक्षणिक पात्रता: बी.कॉम/ सीए इंटर आणि संबधित कामाचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव. तसेच प्रत्येक पदासाठी या व्यतिरिक्त सविस्तर शैक्षणिक पात्रता असून त्यासाठी सविस्तर अधिसूचना वाचावी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Recruitment of various posts in mitc dag 87 ssb

First published on: 25-09-2023 at 10:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×