नागपूर : कुठलीच गोष्ट धर्माशिवाय चालत नाही. सर्व युगात धर्माची आवश्यकता असून धर्म नसेल तर सृष्टी-नियम राहणार नाहीत. धर्म हा आचरणाने वाढतो. आपल्या आचरणावर दृढ राहून धर्मरक्षणाचे कार्य प्रत्येकाने केले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केली.

संकेश्वर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांच्यातर्फे सद्गुरुदास महाराज यांना ‘धर्मभास्कर’ हा सन्मान बुधवारी प्रदान करण्यात आला. नागपुरातील सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मोहन भागवत होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काशीपीठाचे गणेशशास्त्री द्राविड, कर्नाटकातील कंपाली पीठाचे आचार्य नारायण विद्या भारती उपस्थित होते. समाजाचे संतुलन ढळलेले दिसते, कलह दिसतो, अतिवादिता दिसते, या सर्व विकारांना दूर करणारा धर्म आहे. या शब्दात भागवत यांनी धर्माची व्याप्ती सांगितली व सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे, असे योगी अरविंद यांनी स्पष्ट केले होते असे त्यांच्या भाषणाचा संदर्भ देत भागवत यांनी स्पष्ट केले.

Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”
prakash ambedkar
मविआ-वंचित चर्चेची दारे बंद? तीन जागा स्वीकारण्यास आंबेडकर यांचा नकार

हेही वाचा >>> महाविकास आघाडीचे काम म्हणजे ‘वर्क फ्रॉम जेल’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

जेव्हा जेव्हा हिंदू राष्ट्राची उन्नती होते तेव्हा ती त्या धर्माचीही उन्नती होते. आता सनातन धर्माची उन्नती व्हावी ही इच्छा भगवतांची आहे म्हणून हिंदुस्थानचे उत्थान निश्चित आहे, असेही ते म्हणाले. देशावरील परकीयांच्या आक्रमणाचा इतिहास सांगताना त्यांनी ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीमुळे भारत अपराजित राहिला. कालौघात नष्ट झालेल्या देशाच्या सत्वाला पुनरुज्जीवित करण्यासाठी वैदिक ज्ञानाचे शिक्षण देण्याची गरज आहे, असे भागवत म्हणाले. सद्गुरुदास महाराजांचा गुणगौरव करताना सरसंघचालकांनी त्यांचे सेवाकार्य आणि परोपकरी वृत्तीचा उल्लेख केला. संकेश्वर पीठाने त्यांना ‘धर्मभास्कर’ सन्मान देऊन उचित गौरव केला. सद्गुरुदास महाराजांचे धर्मकार्य पुढे न्यायचे असेल तर प्रत्येकाने धर्मासाठी स्वत:ला वाहून घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा >>> “आदित्यच्या बापाचेच पद…”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

अखेरच्या श्वासापर्यंत धर्मकार्य घडावे – सद्गुरूदास महाराज

कलियुगात धर्म लयाला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत धर्म टिकवायचा असेल तर नामसंकीर्तन आणि गुरुभक्ती आवश्यक आहे. संकेश्वर पीठाने अत्यंत प्रेमाने धर्मभास्कर उपाधी देऊन सन्मान केल्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी पार पडण्याचे व अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या हातून धर्मकार्य घडत राहावे, असे भावोद्गार सद्गुरूदास महाराज यांनी ‘धर्मभास्कर’ सन्मान स्वीकारल्यानंतर काढले.