लोकसत्ता टीम

बुलढाणा : आरक्षणवरून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा उभा संघर्ष निर्माण झाला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा प्रातिनिधिक पुतळा जाळण्यात आल्याने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याची प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असल्याने पोलीस ‘अलर्ट मोड’ वर असल्याचे चित्र आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
बुलढाणा : पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले! माजी सैनिक अत्यवस्थ!
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?

मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्याला लागूनच असलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) तालुक्यातील सायंदेव येथे हा खळबळजनक घटनाक्रम घडला. आज संध्याकाळी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. सायंदेव येथे आज सकाळी दहा वाजताच्या सुमारे ९ जणांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. यानंतर जरांगे पाटील यांचा पुतळा जाळला. याची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसडीपीओ अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा-भंडारा: तरूणीचा ‘विवस्त्र’ डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल; डान्स हंगामाच्या नावावर अश्लिल नृत्य

पोलीस हवालदार अब्दुल रहेमान परसुवाले यांनी स्वतः फिर्याद दिली. प्रकरणी सुमारे ९ इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपीमध्ये सोपान नामदेव खरात, सज्जन गणेश शेळके, अरुण जगन खरात, संदीप जनार्दन खरात, गणेश आसाराम नागरे यासह तीन ते चार जणांचा समावेश आहे.

Story img Loader