नागपूर : येथे डेंग्यू, चिकनगुनियासह संसर्गजन्य आजाराचे थैमान असतांनाच निवासी डॉक्टरांच्या संपाने नागपुरातील मेडिकल, मेयोची रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. दुसऱ्या दिवशी या संपाला पाठींबा देत वरिष्ठ निवासी डॉक्टरांसह आंतरवासिता डॉक्टरांनी १६ ऑगस्टपासून संपात उतरण्याची घोषणा केल्याने येथील रुग्णांचा जिव टांगणीला आहे.

कोलकात्यामध्ये सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाली. त्याविरोधात देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात रोष आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करासह सर्व शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षेचे अंकेक्षणसह इतर सोय करासह इतर मागणीसाठी नागपुरातील मेडिकल, मेयोसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर १३ ऑगस्टपासून संपावर गेले आहे. परंतु आंदोलकांकडून अतिदक्षता विभाग व आकस्मिक विभागातील सेवा सुरू ठेवली आहे.

Shilpa Shetty Post on Ladki Bahin Yojana
Shilpa Shetty : लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीची पोस्ट, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी..”
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचाग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Asha Sevika, Group Promoter Employees Union, CITU, Ladaki Bahin Melava, Nagpur, Boycott, Demands, Dengue, Chikungunya, Government Promises, Chief Minister Ladki Bahin Yojana
नागपुरातील लाडकी बहीण मेळाव्यावर आशा सेविकांचा बहिष्कार.. झाले असे की…
Nagpur, pub, Shankarnagar to Dharampeth, drugs, ganja, police inaction, political leader, youth, nightlife, complaints, loud DJ, drug trafficking,
नागपूर : गांजा-ड्रग्जच्या नशेत तरुण-तरुणी धुंद! ‘त्या’ पबला राजकीय वरदहस्त
Chikungunya outbreak in Nagpur government doctors on strike
नागपुरात चिकनगुनियाचे थैमान, शासकीय डॉक्टर संपावर…
Nagpur Youth Drowned video marathi news
Video: स्टंटबाजी भोवली! तलावाच्या भिंतीवर चढून मस्ती; एक बुडाला, दोघे बचावले
revised pension to maharashtra government employees proposal in state cabinet meeting today
कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रस्ताव

हेही वाचा…बुलढाणा : वादग्रस्त भक्तीमहामार्ग विरोधात शेतकरी उतरले पैनगंगेत…

निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मेडिकल- मेयोतील तीस नियोजित शस्त्रक्रिया स्थगित झाल्या होत्या. तर रुग्णांना दाखल करण्यापासून विविध तपासणींची संख्या घसरली. दुसरीकडे मेडिकल- मेयोतील एक हजार डॉक्टर कमी झाल्याने दोन्ही रुग्णालयातील बऱ्याच वार्डात डॉक्टर कमी असल्याने रुग्ण सेवेवरही परिणाम झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या संपामुळे मेडिकल- मेयोत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये भिती पसरली असतांनाच आता बुधवारी सेवेवरील वरिष्ठ निवासी डॉक्टर, प्रशिक्षणार्थ संवर्गातील आंतरवासिता डॉक्टरांनीही निवासी डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा दर्शवला. सोबत या दोन्ही डॉक्टरांकडूनही १६ ऑगस्टपासून संपात उतरण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सेवेवरील डॉक्टरांची संख्या आणखी घसरून येथील रुग्णांवर उपचार मिळणार कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान या दोन्ही संघटनांकडून वैद्यकीय शिक्षण खाते आणि संबंधित महाविद्यालयातील अधिष्ठात्यांना संपाची नोटीस बजावली गेली. त्यामुळे शासनाकडून नागपुरातील मेडिकल- मेयोसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडू नये म्हणून काय उपाय केले जाणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…पटोले म्हणतात,‘महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीदासाठी …’

सलग दुसऱ्या दिवशीही निदर्शने

मेडिकल आणि मेयोतील निवासी डॉक्टर संपावर गेल्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी दोन्ही रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग परिसरात संपकर्त्यांनी निदर्शने केली होती. दुसऱ्या दिवशी बुधवारीही सकाळी ९.३० वाजता आंदोलकांनी बाह्यरुग्ण विभाग परिसरात एकत्र येत विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. शासनाकडून कोलकातातील घटनेविरोधात केंद्रीय प्राधिकरणाकडून गुन्हाचा तपास, तेथे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर पोलीस अत्याचार करणार नाही, निवासी डॉक्टरांना चोख सुरक्षा व्यवस्था, चांगल्या निवासाची सोय, डॉक्टरांवरी हल्लेविरोधात कडक कायदासह इतर मागण्या पूर्ण होईस्तोवर आंदोलन परत घेणार नसल्याचा इशारा दिला.