नागपूर: जागतिक स्तरावर संस्कृतचा स्वीकार व्हावा; निवृत्त सरन्यायाधीश बोबडे यांची अपेक्षा

जागतिक स्तरावर संस्कृतचा स्वीकार व्हायला हवा, अशी अपेक्षा निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केली.

Retired Chief Justice Sharad Bobde
निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

जागतिक स्तरावर संस्कृतचा स्वीकार व्हायला हवा, अशी अपेक्षा निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केली.विश्वश्वरैय्या राष्ट्रीय तांत्रिक संस्थेमध्ये (व्हीएनआयटी) ‘संस्कृत इन टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर नेक्स्ट फाइव्ह इयर्स’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी कार्यशाळेच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे प्रा. श्रीनिवास वरखेडी, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे उपस्थित होते. श्रीनिवास वरखेडी यांनी सांगितले की, सुमारे १२० संस्थांमध्ये संस्कृत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा >>>वर्धा: नाद खुळा! युवा शेतकऱ्याने साकारले ‘फाईव्ह स्टार’ मचान

व्हीएनआयटीने संस्कृतच्या संवर्धनासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे आणि पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले. हा उपक्रम भारतातील इतर आयआयटी, एनआयटी, आयआयएम आणि इतर संस्थांसाठी नक्कीच आदर्श ठरेल, असे ते म्हणाले. या कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. मोहन खेडकर यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, ‘तांत्रिक ज्ञानासाठी संस्कृत’ हा विषय त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पदवीधरांसाठी सुरू करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 12:45 IST
Next Story
दुचाकीचा धक्का, कडाक्याचे भांडण अन थेट गोळीबार! नागपूरच्या मोमीनपुऱ्यात मध्यरात्री थरार
Exit mobile version