scorecardresearch

Premium

‘स्क्रब टायफस’चा धोका वाढला, यवतमाळमध्ये १० रुग्ण…

जिल्ह्यात साथींच्या आजारांनी डोके वर काढले असून ‘स्क्रब टायफस’चे १० रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Risk of Scrub Typhus increased
पावसाळ्यात गवतात होणारे पिसू, गवतावरील माशा व कीटक चावल्यामुळे हा आजार होतो. (फोटो- प्रातिनिधिक)

लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यात साथींच्या आजारांनी डोके वर काढले असून ‘स्क्रब टायफस’चे १० रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफईड या साथी पाठोपाठ स्क्रब टायफस चा धोका वाढला आहे. येथील कै.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत दहापेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. पावसाळ्यात गवतात होणारे पिसू, गवतावरील माशा व कीटक चावल्यामुळे हा आजार होतो.

There is no yellow mosaic on soybeans
सोयाबीनवर तो ‘पिवळा मोझॅक’ नसून… शास्त्रज्ञांच्या पथकाचा शासनाला अहवाल
nashik district rain, nashik dams, dams in nashik, 83 percent water storage in dams, nashik dams 83 percent water storage
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ८३ टक्क्यांवर; १४ धरणांमधून विसर्ग
Anganwadi recruitment Chandrapur
चंद्रपूर : भरती रद्द करा! ५३३ अंगणवाडी सेविकांच्या भरतीत अर्थकारणाचा आरोप
Gadchiroli District Hospital
प्रवेश पंचतारांकित, आत कोंडवाडा! गडचिरोली जिल्हा रुग्णालय अस्वच्छता आणि गैरसोयीमुळे आजारी

साधारणपणे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात हा आजार डोके वर काढतो. सध्या यवतमाळ जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. भारताच्या सीमावर्ती व डोंगराळ भागात व नेपाळमध्ये आढळणारा हा तापाचा प्रकार जिल्ह्यात तो आता भारतातही हळूहळू सर्वत्र पसरत आहे. तापाच्या रुग्णांचे रक्ताचे नमूने घेण्यात आल्यावर हे रुग्ण स्क्रब टायफासचे असल्याचे स्पष्ट झाले. स्क्रब टायफस हा एक प्रकारचा तीव्र स्वरूपाचा ताप येणारा आजार आहे.

आणखी वाचा-खळबळजनक! विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे जुगार अड्डे

या आजारात डोक दुखणे, थंडी वाजणे, ताप येणे अशी प्राथमिक लक्षणे आढळतात. शरीराच्या ज्या भागावर किडा चावतो, त्या जागेवर काळ्या रंगाची जखम होते. त्याभोवती एक ते दोन समी व्यासाची गडद लाल रंगाचे रिंग (स्क्रब) तयार होते. ती जखम दुखत नाही. त्यातून कोणत्याही प्रकारचा स्त्राव वाहत नाही. रुग्णाच्या शरीरातील पांढर्‍या पेशीचे प्रमाण घटत जाते. त्याचा परिणाम शरीरातील किडनी, ह्रदय व मेंदूवर होण्याची शक्यता अधिक असते. आजाराचे वेळीच निदान न झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे.

आणखी वाचा-धक्कादायक..! राज्यात प्रत्येक ३९ मिनिटाला एक नवजात मृत्यू

वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने येथे धोकादायक स्थितीतील रुग्ण नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत १० पेक्षा जास्त स्क्रब टायफसचे रुग्ण उपचारासाठी आले. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. मात्र तापाची लक्षणे दिसल्यास कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर न काढता, तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे, असे आवाहन येथील वैद्यकीय महाविद्यालयातील औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बाबा येलकेयांनी केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Risk of scrub typhus increased 10 patients in yavatmal nrp 78 mrj

First published on: 22-09-2023 at 11:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×