रस्ते अपघात सर्वाधिक कारणीभूत; अहवालातून बाब उघड

नागपूर : केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाने डिसेंबर २०२० मध्ये भारतातील बिबट्यांच्या स्थितीचा अहवाल जाहीर के ला. या अहवालानुसार, बिबट्यांच्या संख्येत देशात महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मात्र, याच महाराष्ट्रात बिबट्यांच्या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे.

सलग तीन वर्षांपासून राज्यात बिबट्यांच्या मृत्यूचा आलेख वाढत आहे. राज्यात २०१९ मध्ये बिबट्यांच्या मृत्यूची संख्या ११० होती. गेल्या वर्षी (२०२० मध्ये) ही संख्या १७२ होती, तर या वर्षी सहा महिन्यांतच ही संख्या ९५ पर्यंत पोहोचली आहे. रस्ते अपघात हे बिबट्यांच्या मृत्यूसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरत आहेत. जंगलाजवळून जाणारे रस्ते, रस्त्यांचे रुंदीकरण आणि वेगाने धावणारी वाहने यामुळे रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. महामार्ग मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे १५ हजार किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. २०२० मध्ये १७२ पैकी ३४ बिबटे रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडले होते. या वर्षी पहिल्या सहा महिन्यांतच झालेल्या ९५ मृत्यूंपैकी अर्धेअधिक मृत्यू हे रस्ते अपघातांत झाले आहेत. रस्ते बांधताना वन्यप्राण्यांसाठी ज्या खबरदारीच्या उपाययोजना करायला हव्यात, त्यात अद्याप त्रुटी आहेत. प्रामुख्याने पुणे-नाशिक महामार्गासह नाशिक, पालघर, ताडोबा, गोंदिया या ठिकाणी रस्ते अपघातांत बिबटे अधिक मृत्युमुखी पडले आहेत. याव्यतिरिक्त वीजप्रवाह, विषप्रयोग यामुळेही बिबट्यांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. तसेच या वर्षी नागपूर जिल्ह्यात पाण्याअभावी तर भंडारा जिल्ह्यात कालव्यात पडून बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

 

धक्कादायक…

भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संके तस्थळानुसार देशात गेल्या सहा महिन्यांत ३१० बिबटे मृत्युमुखी पडले. त्यातील ९५ मृत्यू एकट्या महाराष्ट्रातील आहेत. बिबट्यांच्या मृत्यूची ही आकडेवारी म्हणजे या प्रजातीसाठी धोक्याची घंटा आहे.

मार्ग धोकादायक…

’कोहमारा-गोंदिया चारपदरी रस्ता होत आहे आणि तो पूर्व नागझिऱ्यातून जात आहे.

’या चौपदरीकरणात जवळजवळ दहा किलोमीटरचा परिसर जंगलाचा  आहे.

’या रस्त्याच्या आजूबाजूला

गेल्या काही महिन्यांपासून वाघाच्या कु टुंबाचा वावर आहे. याच कु टुंबातील एक वाघ अलीकडेच रेल्वेच्या धडके त मृत्युमुखी पडला होता.

 

बिबट्यांचे मृत्यू अनेकदा नोंदवलेच जात नाहीत. के वळ पाच ते दहा टक्के च नोंदी होतात. राष्ट्रीय महामार्ग असो किं वा रस्ते महामार्ग, ते तयार होत खबरदारीच्या उपाययोजना आवश्यक आहेत. त्यासाठी स्थानिक सल्लागार समितीचे गठन करून या समितीसमोर हे प्रकल्प आले पाहिजे. – सावन बाहेकर, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया