कर्जत जामखेडमधील अधिकार्‍यांवर दबाव असल्याचा आरोप भाजपा खासदार विखे पाटील यांनी केला होता. मात्र, सामान्य लोकांची कामे करत असताना अधिकाऱ्यांवर माझा दबाव असतोच, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. सोमवारी काटोल दौ-यासाठी नागपूर येथे आले असता माध्यमांशी बोलत होते.

ते पीए नाहीत कॉर्डिनेटर
आमदार एवढा काम करत असेल आणि लोकांच्या हितासाठी लोकांमध्ये जाऊन काम करत असेल. तर समन्वयासाठी जास्त पीए लागतीलच. मुळात ते पीए नाही तर कॉर्डिनेटर आहेत. कदाचित सुजय विखेंना हेच सांगायचे होते, की त्या ठिकाणी अतिशय चांगले काम सुरू आहे. आता काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही ते पाहण्यासाठी माझे अनेक कॉर्डिनेटर त्या ठिकाणी कार्यरत असल्याचेही पवार म्हणाले


रोहित पवारांचा अयोध्या दौरा
रोहित पवार नुकतेच आपल्या कुटुंबासोबत उत्तरप्रदेश दौऱ्यावर जाऊन आले आहेत. या दरम्यान त्यांनी वृंदावन, मथुरा, अयोध्या आणि वाराणसीलाही भेट दिली होती. या भेटीदरम्यानचे फोटो रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअऱ केले होते. कुठल्याही धार्मिक स्थळांवर गेल्यानंतर येणारा अनुभव प्रेरणादायी असतो. अयोध्यासह अजमेर, वाराणसी, पुष्कर आणि सारनाथला ही जाऊन आलो. मन प्रसन्न झालं. ही कौटुंबिक भेट होती. जसे तुम्ही कुटुंबासह मंदिरात जाता तसेच मी पण कुटुंबासह गेलो असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.