नागपूर : आगामी विधानसभा निवडणुका व संघाचे शतकोत्तर वर्षात पदर्पण, या पार्श्वभूमीवर १२ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्भूषण डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित राहणार आहेत. या उत्सवाची तयारी संघाकडून जोरात सुरू असून बुधवारी स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचा सरावही केली. या कार्यक्रमातून सरसंघचालक स्वयंसेवकांना काय संदेश देतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. तसेच संघ शतकोत्तर वर्षात पदार्पण करणार असल्याने सरसंघचालक आपल्या भाषणातून कुठल्या विषयांना स्पर्श करतात याचेही आकर्षण आहे.
कार्यकर्ता विकास वर्गाचे भाषणाची चर्चा
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-२च्या समारोपीय कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मणिपूरसह अनेक विषयांवर भाष्य केले होते. त्यांनी यावेळी सरकारला अनेक सूचनाही केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यात डॉ. भागवत स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>> वाघाचा बछडा मृतावस्थेत….वन विभाग म्हणते, सापाने…..
कार्यक्रमाला दिग्गज उपस्थित राहणार
सरसंघचालकांच्या भाषणातून संघाच्या भविष्यातील योजना व भूमिकांबाबत संकेत मिळत असतात. आगामी काळात महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारवर विरोधकांचा दबाव वाढत आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार पेटला आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक विजयादशमी उत्सवामध्ये काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर १२ ऑक्टोबरला या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी होणार आहेत. सकाळी ७.४० प्रमुख कार्यक्रम, त्यापूर्वी स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार आहे.
हेही वाचा >>> दर्जेदार कामे केली नाही, तर खबरदार, काय म्हणाले गडकरी….
ज्वलंत विषयांवर भाष्य?
विविध राज्यांच्या निवडणुका, मणिपूरमध्ये वाढता हिंसाचार, बंगालमधील परिस्थिती, देशातील वर्तमान सामाजिक व आर्थिक स्थिती, महागाईचा भार, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय आदींसंदर्भात डॉ. भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असा राहणार पथसंचलनाचा मार्ग
रेशीमबाग मैदानातून स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या मार्गावरुन एकाचवेळी दोन पथसंचलन निघणार असून पहिले पथसंचलन रेशीमबाग, क्रीडा चौक, अपोली फार्मसी, बॅटरी हाऊस, उमेरड मार्ग रेशीमबाग मैदानावर तर दुसरे पथसंचलन हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक २ मधून बाहेर निघून पुष्पांजली – देवांजली अपार्टमेंट, गजानन चौक, आराध्य ज्वेलर्स, मयूर मंगल कार्यालय, गणेशनगर मैदान, सुरेश भट सभागृहासमोरुन रेशीमबाग मैदानावर पोहचणार आहे.