scorecardresearch

Premium

बुलढाण्यात अवतरले ‘केदारनाथ’! रुद्र गणेश मंडळाचा देखावा

संगम चौकातील हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.

rudra ganesh mandal grand and attractive kedarnath temple decoration for ganpati
केदारनाथ मंदिराचा भव्य व आकर्षक देखावा

बुलढाणा: बुलढाण्यातील गणेश मंडळांच्या संख्येत व दमदार परंपरेत घट होत असताना रुद्र गणेश मंडळाने मात्र आपला लौकिक कायम ठेवला आहे. यंदा मंडळाने चारधाम पैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचा भव्य व आकर्षक देखावा सादर केला आहे. संगम चौकातील हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.

हेही वाचा >>> ९.४६ लाखाचे देयक काढण्यासाठी मागितली एक लाखाची लाच; बाजार समितीचे सभापती, उपसभापती अडकले ‘एसीबी’च्या जाळ्यात

ganesh visarjan karjat
VIDEO: कर्जतमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेले चारजण उल्हास नदीत बुडाले, एकाला वाचवण्यात यश
wardha, Environment friendly, Ganesha devotees, artificial Ganesh Visarjan Kendra, rivers, lakes
वर्धा : पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांची गणेश विसर्जन केंद्रास पसंती; नद्या, तलाव ओस
Jarange family Buldhana
जरांगे कुटुंबीय जालन्याहून बुलढाण्याकडे रवाना, मराठा आरक्षण क्रांती मोर्च्यात होणार सहभागी
five suspects arrested before robbery Dharangaon police jalgaon
दरोड्यापूर्वीच पाच संशयित जाळ्यात; धरणगावातील गस्ती पथकाची कारवाई

काही वर्षांपूर्वी पर्यंत बुलढाण्यातील सर्व मुख्य चौक व नगरात सार्वजनिक मंडळांची स्थापना करण्यात येत होती. मंडळात निकोप स्पर्धा असल्याने  भव्य देखावे साकारण्यात येत होते. ते पाहण्यासाठी  शहरच नव्हे तर पंचक्रोशीतील ग्रामस्थ गर्दी करीत होते. मात्र हे चित्र बदलले असून मंडळाच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर रुद्र मंडळाने मात्र ही परंपरा कायम ठेवली आहे.

मंडळातर्फे दरवर्षी भव्य देखावे सादर करण्यात येतात. तसेच सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येतात. यंदा मंडळाने  केदारनाथ चा देखावा उभारला आहे. हा देखावा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत हा देखावा पाहण्यासाठी भाविक व नागरिक गर्दी करीत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rudra ganesh mandal grand and attractive kedarnath temple decoration for ganpati scm 61 zws

First published on: 25-09-2023 at 21:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×