महेश बोकडे

नागपूर : आरोग्य खात्याने सेवा नियमात बदल करून आरोग्य सहाय्यक पदासाठी बी. एस्सी. शिक्षणाची अट टाकल्याने दहावीच्या निकषावर आरोग्य कर्मचारी म्हणून सेवा सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे द्वार बंद झाले. त्यावर आंदोलनानंतर कर्मचारी संघटनेसोबत झालेल्या बैठकीची माहिती शासनाला पाठवत त्यात शिथिलतेचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला. परंतु हा प्रस्ताव धूळखात आहे.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…
Decline in bad loans of public sector banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण
Uttar pradesh kruti raj
अन् तिने चेहरा लपवून केला पर्दाफाश, आरोग्य केंद्रातील दूरवस्थेची महिला IAS अधिकाऱ्याकडून झाडाझडती!

सार्वजनिक आरोग्य विभागाकडे राज्यात ६ हजार आरोग्य कर्मचारी, तीन हजारांच्या जवळपास आरोग्य सहाय्यक आहेत. पूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी दहावीचा निकष होता. या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतून आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती मिळायची. दरम्यान, ऑगस्टमध्ये संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे कार्यालयाने या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी करण्याची सूचना केली. त्यानुसार सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) नागपूर यांनी जुन्या निकषानुसार १२० आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पाठवला.

अध्यक्ष उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांनी त्याला मंजुरीही दिली. राज्यातील इतरही भागात कमी-अधिक अशीच प्रक्रिया झाली. परंतु २९ सप्टेंबरला शासनाने पदोन्नती नियमावलीत बदल झाल्याने नवीन शिक्षण अर्हतेवर बोट ठेवत जुन्या प्रस्तावावरील पदोन्नती शक्य नसल्याचे सांगितले. या विषयावर नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. शासानाने योग्य कार्यवाहीसाठी चर्चेचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित झाले. या विषयावर आंदोलकांची आरोग्य विभागातील वरिष्ठांसोबत बैठक झाली. यातील माहिती व जुन्या कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीच्या निकषात शिथिलतेबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर झाला. परंतु शासन निर्णय घेत नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला थांबा लागला आहे. इतरांच्याही पदोन्नतीचा मार्ग सुरू होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांत रोष आहे.

‘‘आरोग्य कर्मचारी म्हणून वर्षानुवर्षे सेवा दिल्यावर आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती मिळते. परंतु शासनाने नियमावली बदलल्याने नागपूर विभागात १२० तर इतरत्रही मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबली. आंदोलनानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यावर हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मिळाले. परंतु काहीच होत नसल्याने पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आणली जात आहे.’’

पंकज उल्लीपवार, पदोन्नती पात्र कर्मचारी कृती समिती.

‘‘नवीन सेवा नियमामुळे जुन्या सेवा नियमातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यावर कर्मचाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. त्यात आलेल्या विविध मागण्यांसह आवश्यक कागदपत्रे शासनाला सादर केली आहे.’’

डॉ. एस.व्ही. लाळे, सहसंचालक, आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग, पुणे