scorecardresearch

धावती ‘गीतांजली’अचानक थांबली!; नागपूर-गोंदिया मार्गावर प्रवासी अडकले

नागपूरहून गोंदियाकडे निघालेल्या गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन कळमना जवळ अचानक नादुरुस्त झाले.

धावती ‘गीतांजली’अचानक थांबली!; नागपूर-गोंदिया मार्गावर प्रवासी अडकले
संग्रहित छायाचित्र

गाडी अनेक तास उभी, रेल्वेकडून वेळेत मदत नाही

नागपूर : नागपूरहून गोंदियाकडे निघालेल्या गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन कळमना जवळ अचानक नादुरुस्त झाले. त्यामुळे ही गाडी येथे काही तास थांबवून ठेवण्यात आली. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

हेही वाचा : वाशीम : शिंदे गट भाजपच्या वाटेवर?; ‘त्या’ फलकांवरील छायाचित्रांवरून जोरदार चर्चा

नागपूर रेल्वे स्थानकावरून सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान गीतांजली एक्सप्रेस गोंदियाच्या दिशेने निघाली, परंतु कळमना जवळ असताना या गाडीचे इंजिन अचानक नादुरुस्त झाले आणि ही गाडी तिथेच थांबली. परिणामी, इतर गाड्यांना लूप लाईन वरून वळवण्यात आले. काही तास ही गाडी उभी होती परंतु रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच मदत करण्यात आली नाही, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Running gitanjali suddenly stopped passengers stuck nagpur gondia route ysh

ताज्या बातम्या