चंद्रपूर : पावसाळ्यात तीन महिन्यांसाठी बंद असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प शनिवार, १ ऑक्टोंबरपासून सुरू झाला. पर्यटकांनी शनिवारी सकाळ आणि संध्याकाळी सफारीचा आनंद घेतला. पहिल्याच दिवशी येथे पर्यटकांची गर्दी बघायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालय परिसरात अखेर प्रभातफेरी बंद; उच्च न्यायालयाचा निर्णय

हेही वाचा >>> नागपूर: शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचा प्रकार! ; जिल्हा प्रशासनाकडून उपेक्षा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प दरवर्षी पावसाळ्यात बंद असतो. करोना संक्रमण काळ आणि पावसाळ्यात बंद असलेला हा प्रकल्प शनिवारपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. ऑनलाईन बुकींग तसेच स्पॉट बुकींग फूल असल्याने अनेक पर्यटकांचा हिरमोडही झाला. मोहुर्लीच्या सरपंच सुनीता कातकर, रिसोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय डिमोले, श्रीकांत अरवल, मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड, शशी काटे, मार्गदर्शक अनिल तिवाडे, पवन मुंडूलवार यांनी मोहुर्ली प्रवेशद्वाराची पूजा करून फित कापली. त्यानंतर सफारी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर व सहकाऱ्यांनी ताडोबात प्रवेश करणाऱ्या सर्व पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पहिल्याच दिवशी पर्यटकांची झालेली गर्दी बघता यावर्षी ताडोबा हाऊसफुल्ल राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी व दसरा असल्याने या महिन्यातील बुकींग आतापासूनच पूर्ण झाल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Safari begins tadoba tiger project crowd tourists on the first day ysh
First published on: 02-10-2022 at 10:51 IST