अमरावतीतील कवी पवन नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. पवन नालट यांनी हा पुरस्कार तरुणाईच्या लिहित्या हातांना अर्पण केला आहे.

हेही वाचा- “नागपूर-हैदराबादला जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करा”, मुनगंटीवारांची केंद्र सरकारकडे मागणी

Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
Vijay Bhatkar
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

गेल्या दोन दशकांपासून साहित्याच्या क्षेत्रात मुशाफिरी करीत असताना मिळालेला हा पुरस्कार हुरूप वाढवणारा आहे, अशी प्रतिक्रिया पवन नालट यांनी दिली. पवन नालट यांच्या या काव्यसंग्रहाला यापूर्वी प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा वाङ्मय पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, वाङ्मय चर्चा केंद्र बेळगाव, अनिल साठे पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.