scorecardresearch

एकीकडे साहित्य संमेलनाची लगबग, दुसरीकडे वर्धेकरांची स्वच्छता मोहीम; हाती झाडू घेत शहर लख्ख करण्याचा चंग

संमेलनस्थळाकडे येणारे सर्व रस्तेच नव्हे तर गजबजलेल्या परिसरात आज सकाळपासून झाडू फिरला.

A chance to sweep the city with a broom
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वर्धा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज पहाटेपासून वर्धेकरांनी हाती झाडू घेत शहर लख्ख करण्याचा चंग बांधला. संमेलनस्थळाकडे येणारे सर्व रस्तेच नव्हे तर गजबजलेल्या परिसरात आज सकाळपासून झाडू फिरला. नगर परिषदेच्या कर्मचा-यांसोबतच शहरातील डॉक्टर, उद्योजक, व्यापारी, समाजसेवी आपल्या कुटुंबासह स्वच्छतेला लागले.

हेही वाचा >>> मोठ्या उत्साहाने, आनंदाने व अपेक्षेने वर्धेला येत आहे; संमेलनाध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर यांची प्रतिक्रिया

शहरात प्रथमच असे सार्वजनिक स्वच्छता कार्य चालल्याची नोंद झाली. संमेलनाचे कार्यवाह प्रदीप दाते व पर्यावरणप्रेमी मुरलीधर बेलखोडे यांनी विविध कार्यकर्ते तसेच समिती सदस्यांना शहराच्या प्रत्येक परिसराची जबाबदारी वाटून दिली होती. त्यामुळे शिस्तीत हे काम चालले. सर्व भागातील स्वयंसेवक शेवटी समेलनस्थळाकडे निघतील. या ठिकाणी पण सामूहिक स्वच्छता कार्य चालणार आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 11:02 IST
ताज्या बातम्या