‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात जागतिक प्रेम दिनी पाश्चिमात्यांचे अनुकरण न करता विद्यार्थ्यांना योग्य संदेश देता यावा म्हणून दरवर्षी प्रमाणे गोंडराजे यांचे समाधीस्थळी ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रमातून प्रेमाचे प्रतीक असलेल्या समाधीस्थळी विद्यार्थ्यांनी गुलाबी पुष्प अर्पण केले.

गोंडकालिन ऐतिहासिक वास्तु असलेली गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीस्थळी ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी

प्रेमाचे प्रतीक असलेले राजे बिरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्युनंतर या वास्तुचे सुंदर असे बांधकाम केले होते. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवानातील सुंदर आकर्षक अशी वास्तु बांधून न थांबता राजेच्या मृत्युनंतर चंद्रपूर राज्याचा राज्यकारभार योग्यरित्या सांभाळत अनेक विकासकामे केलेली आहेत.

हेही वाचा >>> आमदार यशोमती ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाल्या, “अधिकारी वीज कनेक्शन कापण्यासाठी शेतात आले तर त्यांना तिथेच झोडा”

अनेक मंदीराचा जिर्णोध्दार सुध्दा केलेला आहे, राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतिहासात नोंदवला गेला आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातून आपल्या पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केले आहे. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.

 ‘‘चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तु खऱ्या अर्थाने आपला वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातुन राजा बिरशहा व राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माणा सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून या राणीने एक आदर्श घालुन दिलेला आहे’’ असे मत प्राचार्या प्रा डॉ. मीनाक्षी ठोंबरे यांनी सलाम राणी हिराई या कार्यक्रमादरम्यान आपल्या मनोगतात व्यक्त केले.  ‘‘राणी हिराई आणि राजा बिरशहा यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्युनंतरही अजरामर झाले आहे, त्याच्या कार्यातुन ते सतत जिवंत राहणार आहे. आजच्या दाम्पत्यांनी तसेच युवकांनी अशा स्थळ, स्मारक यांना भेट देत हा आदर्श घेण्याची गरज असल्याचे, मत यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केले.