scorecardresearch

नागपुरात आयएसआय प्रमाणित नसलेल्या खेळण्याची विक्री

उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर आयएसआय मार्क नसलेल्या खेळण्यांची नियमबाह्य विक्री होत आहे.

नागपुरात आयएसआय प्रमाणित नसलेल्या खेळण्याची विक्री
साठे वाडा येथील मेसर्स विशाल किड्स वर्ल्ड

नागपूर: उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर आयएसआय मार्क नसलेल्या खेळण्यांची नियमबाह्य विक्री होत आहे. भारतीय मानक ब्यूरोने (बीआईएस) शहरातील दोन वेगवेगळ्या भागातील दोन प्रतिष्ठानांवर छापे मारले. यावेळी दोन्ही प्रतिष्ठानांतून मोठ्या प्रमाणावर खेळणी जप्त करण्यात आल्या.

बीआयएस विभागाकडून ही कारवाई बर्डी  मोदी क्रमांक १, साठे वाडा येथील मेसर्स विशाल किड्स वर्ल्ड आणि पूर्व हायकोर्ट रोड, न्यू रामदासपेठ येथील मेसर्स बोन्साई सुयश मार्ट या प्रतिष्ठानांवर केली गेली. छाप्यादरम्यान विशाल किड्समध्ये २५ प्रकारचे तर बोन्साई सुयशमार्टमध्ये २३ प्रकारचे नियमबाह्य खेळणे सापडले. दोन्ही प्रतिष्ठानांत सापडलेल्या खेळण्यांत रंगीबेरंगी इंटरलॉकिंग ब्लॉक्स, लाईट आणि साउंड, कंपन गन, पेप्पा पिग, ड्रम सेट, कार टॉय, रिमोट कंट्रोल कार, किड्स पियानो इत्यादीचा समावेश होता. त्यामुळे विशाल किड्समधून १८१ तर बोन्साय सुयश मार्टमधून ११८ आयएसआय मार्क नसलेले खेळणे जप्त करण्यात आले.

हेही वाचा >>> “हसन मुश्रीफांना विकत…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर खळबळजनक आरोप

बीएसआय कायदा २०१६ च्या तरतुदीनुसार दोन्ही प्रतिष्ठानांवर कारवाई केली जाणार असल्याचेही भारतीय मानक ब्यूरोकडून सांगण्यात आले. कायद्याने विविध प्रतिष्ठानांत आयएसआय मार्क असलेलेच खेळणेच विकता येतात. हे मार्क नसलेल्या खेळणे विक्रीसाठी ठेवता येत नाही. ती निकृष्ठ दर्जाची असू शकतात. त्यामुळे आयएसआय मार्क असलेलीच खेळणी नागरिकांनी विकत घेण्याचे आवाहन बीआईएस विभागाकडून केले गेले. कुणी आयएसआय मार्क नसलेली खेळणी विकत असल्यास बीआईएसच्या नागपूर कार्यालयातील ०७१२- २५४०८०७ अथवा ०७१२- २५६५१७१ या भ्रमनध्वनी क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहनही यावेळी केले गेले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 16:02 IST

संबंधित बातम्या