जनसंवाद कार्यक्रमात संभाजी राजेंची गर्जना

नागपूर : चर्चेत वेळ घालवू नका, आरक्षणावर तातडीने तोडगा काढा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा राज्यसभा सदस्य व मराठा समाजाचे नेते छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारला दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाजी पुतळा चौकात झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नागपूरचे मुधोजी राजे भोसले, राजे संग्रामसिंह भोसले, दीपक जाधव, छोटू पवार, प्रशांत भोसले आदी सकल मराठा समाजाचे इतर नेते उपस्थित होते. मराठा शिपाई म्हणून वाडय़ातून बाहेर पडलो ते केवळ समाजासाठी. सरकारने आमची बाजू समजून आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढला पाहिजे. सरकरने वेळकाढू धोरण सोडावे व तोडगा काढावा, केवळ चर्चा करून मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाही तर सरकारला निश्चित धोरण ठरवावे लागेल. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी एकत्र यावे, अशीही मागणी संभाजी राजे यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji raje maratha morcha nagpur ssh
First published on: 06-07-2021 at 00:37 IST