नागपूर: विधान परिषदेमधील कार्यकाळ संपण्याच्या काही महिन्यांपूर्वी पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे नाराजी व्यक्त करत थेट राजकारणातून निवृत्ती घेण्याचा इशारा देणारे माजी आमदार संदीप जोशी यांना समाज माध्यमावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनेक उपक्रमांमध्ये जोशी यांचा पुढाकार असते असतो. मात्र हल्ली जोशी काही महिन्यांपासून समाज माध्यमांवर अधिकच सक्रिय झाले असून वारंवार मुस्लिम द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट प्रसारित करत असल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

जोशींची पोस्ट काय ?

संदीप जोशी यांनी सोशल मीडियावर भारतात आतापर्यंत झालेल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची एक यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक शिक्षण मंत्री हे मुस्लिम असल्याचा दावा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेला आहे. भारतातील शिक्षण मंत्री एका विशिष्ट विशिष्ट धर्माचे असल्यामुळे आपल्याला मूळ इतिहास शिकवण्यात आला नाही तसेच अकबर आणि हुमायू अशा भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम राजांना मोठा दाखवल्याचे ती काही त्यांनी केली आहे. अशा शिक्षण मंत्र्यांमुळे आपली मूळ शिक्षण पद्धती दूर राहिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

sandip joshi post

काय टीका होत आहे?

जोशी यांच्या पोस्टवर सर्व स्तरातून टीका होत आहे. जोशी हे सुशिक्षित राजकारणे असून सुद्धा व्हाट्सअप युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेवून समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. जोशी साहेब तुमच्या सारखा सुशिक्षित नेता सुद्धा जेव्हा अश्या चुकीच्या whatsapp university चे पोस्ट शेअर करतो फॅक्ट चेक न करता… तेव्हा खरच समजत धार्मिक तेड निर्माण करण्यासाठी भाजप कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकते… चुकीचा विचार पसरवा साहेब… त्वरित डिलीट करा हे पोस्ट… आपण यात हे दाखवण्याच्या प्रयत्न करत आहात की काँग्रेसच्या काडात एक विशिष्ठ धर्माच्याच व्यक्तींना शिक्षण मंत्री करण्यात आले.. पण असं मुळीच नाही आणि खरी माहिती काय ते स्वतः गुगल वर जाऊन जाणून घ्या, अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.

यापूर्वीही झाली होती टीका

यापूर्वी संदीप जोशी यांनी पंढरीच्या वारीदरम्यान मुस्लिम द्वेष पसरवणारी पोस्ट केली होती. यामध्ये एका मुस्लिम नेत्यांनी वारकऱ्यांसाठी काही सुविधा केल्या होत्या त्याचा फलक लावण्यात आलं होतं. त्या फलकावरून जोशींनी टीका केली होती मात्र यावेळीही सोशल मीडियावर जोशींवर सर्व स्तरातून टीका करण्यात आले होती.