scorecardresearch

Premium

नागपुरात संघाच्या विजयादशमी उत्सवाला संतोष यादव प्रमुख पाहुण्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभराव्या वर्षांकडे वाटचाल सुरू असताना संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच पद्मश्री पुरस्कार प्राप्त महिलेला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. 

nl santosh yadav
संतोष यादव प्रमुख पाहुण्या

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभराव्या वर्षांकडे वाटचाल सुरू असताना संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच पद्मश्री पुरस्कार प्राप्त महिलेला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.  हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील जोनियावास गावातील ५४ वर्षीय संतोष यादव यांनी १९९२ आणि १९९३ मध्ये दोनदा एव्हरेस्ट सर केले आहे. असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव ५ ऑक्टोबरला रेशीमबाग संघ स्थानावर आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने संघाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रसिद्ध गिर्यारोहक व पद्मश्री पुरस्कार प्राप्त संतोष यादव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संघाच्या विविध ३६ संघटना असून त्यात राष्ट्र सेविका समिती ही महिलांची संघटनाही आहे. संघाने कुटुंब प्रबोधन हा कार्यक्रम हाती घेतला असून तो देशभर राबवला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संघ परिवारामधील संघटनांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने संतोष यादव यांना आमंत्रित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

akola railway news, hyderabad jaipur weekly special train
रेल्वे प्रवाशांसाठी आनंद वार्ता! ‘या’ साप्ताहिक विशेष रेल्वेला मुदतवाढ
problems to get marriage certificate in nagpur, marriage certificate delayed in nagpur
लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळवणे कठीण; काय आहे वाचा…
nagpur ramtek death of dalit youth, ramtek muslim youth beaten up
“ही तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना”, रामटेकच्या घटनेवर प्रतिक्रिया
washim shivsena aggressive, caste verification certificate
त्रुटीची पूर्तता, तरीही जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळेना; शिवसेना आक्रमक होताच समितीचे अध्यक्ष म्हणतात…

संघ परिवारातील ३६ संघटनांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने नुकत्याच झालेल्या संघाच्या समन्वय बैठकीत चर्चा झाली. संतोष यादव यांना निमंत्रित करण्यामागे संघाच्या दृष्टिकोनात बदल म्हणूनही पाहिले जात आहे. शिवाय २०२४ च्या निवडणुका बघता महिला मतदारांमध्ये आपले स्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी आणि ३३ टक्के आरक्षणासंदर्भातील विधेयक येण्याच्या पार्श्वभूमीवर संघाची ही तयारी असावी.

– दिलीप देवधर, संघ विश्लेषक

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Santosh yadav chief guest at sangh vijayadashmi celebrations nagpur ysh

First published on: 25-09-2022 at 00:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×