वाशीम : लोकशाहीमध्ये मताला मोठी किंमत आहे. निवडणुकीत एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे. केवळ एका मतामुळे अनेक सरकारे जिंकली तर अनेकांचे सरकार कोसळल्याचे इतिहासात दाखले आहेत. असाच एक प्रकार वाशीम जिल्हयातील रिसोड तालुक्याच्या बोरखेडी ग्राम पंचायत निवडणुकीत घडला. येथील सरपंचपदाचे उमेदवार आघाव भिमराव गंगाराम यांना ४७१ तर वायभासे विश्वनाथ गोविंदराव यांना ४७२ मते मिळाली. केवळ एका मताने वायभासे यांना विजयी घोषीत करण्यात आले. यावरून ‘एक वोट कि किमत तुम क्या जानो….’ अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगली होती.

जिल्हयातील २७८ ग्राम पंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. लोकशाहीत मताला प्रचंड मोठी ताकत आहे. अनेकदा एका मताने काय फरक पडणार म्हणून अनेकजन मतदानाकडे दुर्लक्ष करतात. रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथे मात्र केवळ एका मतामुळेच सरपंच निवडून आला तर दुसरऱ्याला एका पराभव पत्कारावा लागला.

forest guard test
तोतयागिरी! वनरक्षकाच्या चाचणीत धावला ‘डमी’ उमेदवार…
Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
bjp candidate for lok sabha election in pune will be decided by party workers
पुण्यात भाजपाचा उमेदवार पदाधिकाऱ्यांकडून होणार निश्चित
Meeting in Mumbai under the chairmanship of Chief Minister Eknath Shinde regarding Sulkood water supply Kolhapur
पुन्हा एकदा ठरलं! सुळकुड पाणी योजनेचा कंडका पडणार; मुख्यमंत्र्यांकडे शुक्रवारी बैठक

हेही वाचा: Maharashtra Assembly Winter Session 2022 Live : नागपूर NIT च्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवरून सरकारविरोधात जोरदार धोषणाबाजी

बोरखेडी येथे सरपंचपदासाठी आघाव भिमराव गंगाराम, वायभासे विश्वनाथ गोविंदराव व जायभाये वैभव कुंडलीक सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मंगळवारी सरपंचपदाचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रभाग क्रमांक १ मध्ये अघाव भीमराव गंगाराम यांना १९१, जायभाये वैभव कुडलीक यांना १६२ तर वायभासे विश्वनाथ गोविंदराव २४१ मते पडली.

हेही वाचा: नागपूर: वेगमर्यादा निश्चित; समृद्धी महामार्गावर १२० किलोमीटर प्रतितासानेच धावता येणार

प्रभाग क्रमांक दोनमध्ये आघाव भीमराव गंगाराम यांना १४०, जायभाये वैभव कुडलीक यंना १०२ तर वायभासे विश्वनाथ गंगाराम यांना १२६ मते मिळाली, तर प्रभाग क्रमांक तीनमध्ये आघाव भीमराव गंगाराम यांना १४०, जायभाये वैभव कुंडलीक यांना १२० तर वायभासे विश्वनाथ गोविंदराव यांना १०५ मते पडली. तीनही प्रभाग मिळून आघाव भीमराव गंगाराम यांना ४७१ तर वायभासे विश्वनाथ गोविंदराव यांना ४७२ मते पडलीत. केवळ एका मताने वायभासे यांना विजयी घोषित करण्यात आले.