नागपूरची मेट्रो ही जागतिक दर्जाची असल्याचा दावा सर्वच करतात. पण त्यात अनेक उणिवाही आहेत. मनुष्यबळाच्या अभाव आणि अन्य कारणांचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे. हिंगणा मार्गावरील शंकरनगर स्थानकावरचे स्कॅनर बंद आहे तर वासुदेवनगर स्थानकावर काहीकाळ एक तिकीट घर बंद असते, अशा तक्रारी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा- अमरावती : शेख मुसांची दरवर्षी अठराशे किलोमीटरची सायकलवारी

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
lawrence bishnoi gang, dadar station
दादर रेल्वे स्थानकावर लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड, पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
uran revas marathi news, karanja to revas ro ro service marathi news
उरण: करंजा-रेवस रो रो जलसेवेचे काम पुन्हा लांबणीवर

नागपूर मेट्रोचा एक टप्पा पूर्ण झाला असून संपूर्ण ३९ किलोमीटर मार्गिकेवर मेट्रोचा प्रवास सुरू आहे. बर्डी ते लोकमान्य नगर, बर्डी ते ऑटोमोटिव्ह चौक, बर्डी ते खापरी आणि बर्डी ते प्रजापतीनगर या मार्गावर मेट्रो पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. मात्र जसजशी प्रवासी संख्या वाढत आहे तशीच प्रवाशांच्या सोयींचा अभावही जाणवत आहे. नागपूर मेट्रो आता प्रजापती नगर आणि ऑटोमोटिव क पर्यंत सुरू झाली. परंतु मनुष्यबळ वाढवले नाही. वासुदेव नगरला सायंकाळी एक बाजूचे तिकीट घर बंद असते. कारण कर्मचारी नाही. पूर्वी प्रत्येक स्थानकाच्या समोर सुरक्षा रक्षक तैनात केले जात होते. ते कमी करण्यात आले.

हेही वाचा- गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; वेडमपल्ली जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक

सफाई कर्मचारी दिवसभर सफाई करताना दिसायचे आता त्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. सीताबर्डीच्या लोकमान्य नगरकडून येणाऱ्या प्रवाशांना प्लॅटफॉर्म नंबर ३ वरून ऑटोमोटिव चौककडे जायचे असल्यास केवळ एक लिफ्ट आहे. ही सर्वात मोठी त्रुटी आहे. कुठलाही दुसरा जिना नाही. या दोन गाड्यांमध्ये ३ मिनिटांचा वेळ असतो अनेकांची धावपळ होते. त्यांना दोन जिने उतरून एक जिना चढावा लागतो. अनेक ठिकाणी सरकते जीने बंद असतात. मेट्रोमध्येनियमित तपासणी केली जात नाही. फक्त काही स्थानकांवरच तपासणी होते.