नागपूर: मेट्रोच्या शंकरनगर स्थानकावरील स्कॅनर आणि वासुदेवनगर स्थानकावरील तिकीट खिडकी महामेट्रोने पुन्हा सुरू केली आहे. स्कॅनर आणि खिडकी बंद होती, याबाबत दैनिक लोकसत्ताने लोकांच्या होत असलेल्या गैरसोयीकडे महामेट्रो प्रशासनाचे लक्ष वेधल्यावर स्कॅनर आणि खिडकी सुरू केली.

हेही वाचा >>> नागपूर : औषध उद्योगांमुळे ‘५ ट्रिलीयन डॉलर’ची अर्थव्यवस्था शक्य, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

lonavala bus fire marathi news, groom s bus catches fire pune marathi news
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वऱ्हाडाच्या बसला आग; ४२ प्रवासी सुखरुप
Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात
illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली

मेट्रोचे सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुले झाल्याने प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकांवरील सुविधांमधील उणिवा आणि अडचणी पुढे येत आहेत. दैनिदिन प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांनी शंकरनगर स्थानकावरील स्कॅनर आणि वासुदेवनगर स्थानकावरची तिकीट खिडकी बंद राहात असल्याचे छायाचित्रच लोकसत्ताकडे पाठवले होते. यामुळे होत असलेल्या गैरसोयींची माहिती दिली होती. यासंदर्भातील वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केल्यावर महामेट्रो प्रशासनाने त्याची दखल घेत स्कॅनर आणि तिकीट खिडकी सुरू केली आहे. मात्र सीताबर्डी एक्सचेंज स्थानकावर क्रमांक तीनच्या फलाटावरून क्रमांक एकच्या फलाटावर येण्यासाठी जीना नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.