शहरात १० डिसेंबरनंतरच निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : करोनाच्या उत्परिवर्तीत विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महापालिकेने आपल्या क्षेत्रातील इयत्ता १ली ते ७वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास १० डिसेंबपर्यंत स्थगिती दिली आहे. जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यास मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. करोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेऊन १० डिसेंबरनंतर शहरातील शाळांबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील, असे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केले आहे.

ग्रामीण व शहरी भागात पहिली पासून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय सरकारने घेतला. शाळा सुरू करण्याबाबत आरोग्य सेवा संचालनालयाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.

त्यानुसार, ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील १ली ते ७वीपर्यंतचे शाळा व वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, करोनाची भीती बघता शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा तूर्तास सुरू होणार नाही. ग्रामीणमधील शाळा मात्र सुरू होणार आहेत. मागील १९ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. करोनाची पहिली लाट ओसरल्यावर मागील वर्षी सरकारने इयत्ता आठवीपासूनच्या शाळा सुरू केल्या होत्या. दरम्यान, दुसरी लाट आल्याने शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा शाळा सुरू होत असून  यावेळी पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools city rural students ysh
First published on: 01-12-2021 at 00:06 IST