भंडारा : भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यात धुमाकूळ घालत आजवर बारा जणांचा बळी घेणाऱ्या ‘सीटी-१’ या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी चार पथके लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात तळ ठोकून आहेत. बुधवारी सकाळी तलावाजवळ एका मासेमाऱ्याला ठार मारल्यानंतर वनविभागाने या वाघाला जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम चालवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वन कर्मचारी मचाणवरून खडा पहारा देत असून शार्प शूटर वाघाला बेशुद्ध करण्याच्या तयारीत आहेत. लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका इसमाला वाघाने हल्ला करून ठार मारले. ही घटना बुधवारी उघडकीस येताच वनविभागात एकच खळबळ उडाली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्रह्मपुरी, वडसा आणि इंदोरा या जंगलात संचार असलेल्या या वाघाने इंदोरा या जंगलात संचार असलेल्या या वाघाने आतापर्यंत १२ जणांना बळी घेतला. त्यात लाखांदूर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. या वाघाला तत्काळ जेरबंद करण्यासाठी भंडारा, वडसा आणि गोंदिया येथील शीघ्र कृती दलासह नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक जंगलात तळ ठोकून आहेत.

हेही वाचा : लोकशाहीच्या मुद्द्यावर ‘बामसेफ धडकणार संघ मुख्यालयावर’ ; ६ ऑक्टोबरला मोर्चाचे आयोजन

भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात साकोली सहायक उपवनसंरक्षक रोशन राठोड, शीघ्र कृती दलाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे, लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित, मानव वन्यजीव संरक्षक शाहिद खान या जंगलात तळ ठोकून आहेत. जंगलात सर्वत्र वाघाचा शोध घेण्यात आला; परंतु सायंकाळपर्यंत थांगपत्ता लागला नाही. बुधवारी रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Search operation to arrest ct 1 the man eating tiger that killed 12 people bhandara gondiya chandrapur gadchiroli tmb 01
First published on: 22-09-2022 at 17:07 IST