उपराजधानीतील ‘एच ३ एन २’ आजार असलेल्या पहिल्या ६८ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूचे कारण बुधवारी मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत सीओपीडी, निमोनियासह इतर सहआजार दर्शवले गेले होते. गुरुवारी दुसऱ्याही एच ३ एन २ आजाराच्या रुग्णाच्या मृत्यूचे कारण ह्रदयविकार व इतर सहआजार दर्शवले गेले. त्यामुळे अद्यापही नागपुरात ‘एच ३ एन २’ आजाराचा एकही मृत्यू नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
हेही वाचा >>>लग्नात जाणाऱ्या पती-पत्नीवर काळाची झडप, दुचाकींच्या भीषण अपघातात दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू
मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत नागपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, नागपूर महापालिकेचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्यासह इतरही शासकीय व खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी प्रथम एम्सच्या डॉक्टरांनी एच ३ एन २ आजार असलेल्या व एम्सला दगावलेल्या ३५ वर्षीय महिला रुग्णाचा इतिहास सांगितला.
महिलेला हृदयविकारासह हृदयातील व्हाॅल्वच्या गंभीर समस्येमुळे अत्यवस्थ अवस्थेत एम्सला आणले होते. वैद्यकीय तपासणीत तिला या विषाणूचीही लागण असल्याचे पुढे आले. परंतु तिच्या मृत्यूला हृदयविकार व इतर सहआजार कारणीभूत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणात आले. त्यामुळे हा मृत्यू ‘एच ३ एन २’ ऐवजी इतर आजाराने झाल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले.
