लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे एकूण ९८ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असून, त्याशिवाय संगणकाशी संबंधित विदा विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अभ्यासक्रमांना पसंती मिळत आहे.

Clashes erupted between supporters of BJP leader Munna Yadav and his relative Balu Yadav
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न; आधी आंघोळीचा व्हिडीओ बनवला नंतर…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
girls admission vocational courses, girls Maharashtra admission,
राज्यातील १ लाख ३९ हजार मुलींनी घेतला व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश, ‘या’ अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?
27 percent of agriculture degree seats vacant
कृषी पदवीच्या २७ टक्के जागा रिक्त; नोकरीच्या संधी, पदभरती घटल्याने विद्यार्थ्यांची पाठ
Student died Borivali , dumper, mumbai,
बोरिवलीमध्ये डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
Five times increase in admission fee in private AYUSH colleges
खासगी आयुष महाविद्यालयांमधील प्रवेश शुल्कात पाच पट वाढ

राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीत १ लाख ४२ हजार ५४४ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्यात आले असून, १९ हजार २८ विद्यार्थी अद्यापही प्रवेशासाठी कॉलेज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : ब्रम्हपुरीतील तिघांची पोलीस उपनिरीक्षकपदी वर्णी, हलाखीच्या परिस्थितीवर मात

या फेरीतील कॉलेजांमधील जागांचे वाटप

राज्यात यंदा इंजिनीअरिंगसाठी १ लाख ६१ हजार ५७२ जागा उपलब्ध आहेत. त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा १ लाख ९२ हजार ३९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील पहिल्या फेरीत १,७६,१११ विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी अर्ज भरून कॉलेजचे पसंती क्रमांक नोंदविले होते. पहिल्या फेरीत यातील १ लाख २६ हजार ४५८ विद्यार्थ्यांना कॉलेजांतील जागांचे वाटप करण्यात आले होते. यातील २८ हजार ७०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दरम्यान, या जागांवरील प्रवेशासाठी सीईटी सेलने २० ते २२ ऑगस्टदरम्यान दुसरी कॅप फेरी घेतली. या फेरीतील कॉलेजांमधील जागांचे वाटप सीईटी सेलने सोमवारी जाहीर केले.

आणखी वाचा- गुजरातच्या कंपनीकडून बोगस खत विक्री, पुण्यातील कंपनीच्या संचालकांसह चार विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

या १९ हजार विद्यार्थ्यांची अडचण काय?

या फेरीसाठी तब्बल १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी अर्ज भरून पसंती क्रमांक सादर केले होते. त्यातील १ लाख ४२ हजार ५४४ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्यात आले आहे, तर १९ हजार २८ विद्यार्थ्यांना कोणतेही कॉलेज मिळू शकले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यंदा ३ लाख ७९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीएम ग्रुपची सीईटी परीक्षा दिली होती, तर गेल्यावर्षी इंजिनीअरिंगसाठी एक लाख ५९ हजार ३१७ जागा उपलब्ध होत्या. त्यामध्ये गेल्यावर्षी १ लाख १७ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतले होते, तर ४१ हजार ३७९ जागा रिक्त राहिल्या होत्या. इंजिनीअरिंगच्या कॅप फेऱ्यांसाठी गेल्यावर्षीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातून यंदा जागा भरल्या जातील, अशी आशा व्यक्त होत आहे.