बुलढाणा : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती, अशी ओळख असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षारक्षक देयक घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी सभापती, संचालक मंडळासह एकूण पंधरा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी सम्यक साक्षी सुरक्षा आणि कामगार कंत्राटदार कंपनीचे संचालक राहुल उत्तम अबगड यांनी तक्रार दिली. आरोपींमध्ये सभापती सुभाष पेसोडे, संचालक गणेश संभाजी माने, गणेश मनोहर ताठे, श्रीकृष्ण म. टिकार, विलाससिंग सुभाषसिंग इंगळे, प्रमोद शामराव चिंचोळकर, संजय रमेश झुनझुनवाला, मंगेश नामदेव इंगळे, सचिन नामदेव वानखेडे, हिम्मत रामा कोकरे, सुलोचना श्रीकांत वानखेडे, वैशाली मुजुमले, सचिव गजानन आमले, कर्मचारी प्रशांत विश्वपालसिंग जाधव, कर्मचारी विजय इंगळे कर्मचारी, रोखपाल गिरीश सातव यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या चौकशीअंती गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तक्रार दाखल होताच आरोपी फरार झाल्याचे समजते.

BJP state executive meeting, Balewadi, pune, police force deployed
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी एक हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त, बालेवाडीत आज बैठक
Tarapur Atomic Power Station, safety,
शहरबात : सुरक्षिततेबाबत चिंता
200 Bed Hospital in panvel, 200 Bed government Hospital in panvel, government approves news hospital for panvel
पनवेलमध्ये २०० खाटांचे सरकारी रुग्णालय
46 7 million new jobs created in fy24 says rbi report
वर्षभरात ४.६७ कोटी नवीन नोकऱ्यांची निर्मिती – रिझर्व्ह बँक; गेल्या आर्थिक वर्षात रोजगार वाढीचा दर ६ टक्क्यांवर
ST employees union insists on agitation
मुंबई : एसटी कर्मचारी संघटना आंदोलनावर ठाम
onion, Nashik, Central Agriculture Committee,
लोकसभा निकालानंतर प्रथमच केंद्रीय कृषी समिती नाशिक दौऱ्यावर, सरकारी कांदा खरेदीतील त्रुटी शोधण्यावर लक्ष
When will Security Guards Wardens get Raincoats in Panvel
पनवेलमधील सुरक्षा रक्षकांना, वार्डनला पावसाळी रेनकोट कधी मिळणार
Water Crisis Looms in Uran, Punade Dam, Punade Dam Dries Up, Tanker Supply Likely in uran tehsil, uran tehsil, marathi news, uran news,
उरण : पुनाडे धरण आटल्याने दहा गावांत पाणीटंचाई; लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टँकरमुक्त तालुका टँकरग्रस्त

हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसकडून कारवाईचा बडगा, प्रदेश सचिव निलंबित

सुरक्षा कंपनी आणि खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याचा करारनामा करण्यात आला. बाजार समितीच्या दोन प्रवेशद्वार आणि मार्केट यार्डमध्ये तीन पाळ्यात (शिफ्ट) ९ सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा करार होता. दरम्यान, मागील २० सप्टेंबर २०२३ मध्ये खामगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीत काँग्रेस नेते माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला बहुमत मिळाले. सभापतीपदी सानंदा यांचे विश्वासू, सुभाष पेसोडे यांची निवड करण्यात आले. शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणणाऱ्या या संचालक मंडळाने आपला खरा चेहरा आणि शेतकऱ्यांना ‘हात’ दाखवीत अपहार केला. प्रत्यक्षात ९ सुरक्षा रक्षक असताना कागदोपत्री ३० रक्षक दाखविण्यात आले. सुरक्षारक्षक कामावर नसतानासुद्धा तब्बल ३२ लाखांची खोटी बिले काढण्यात आली. यासाठी फिर्यादी राहुल अबगड यांच्यावर कमालीचा दवाब आणण्यात आला.

पिंपळगाव राजा उपबाजार मध्येही घोटाळा

खामगाव समितीच्या पिंपळगाव राजा उपबाजार समितीमध्ये असाच सुरक्षा रक्षक देयक घोटाळा झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. कागदोपत्री तीनपट जास्त सुरक्षा रक्षक दाखवून देयके काढण्यात आली. २१ जून ते २०२३ ते १ जानेवारी २०२४ दरम्यानचा हा घोळ आहे. एकदा १९ लाख ३४ हजार ८९४ व दुसऱ्यांदा १२ लाख ६७ हजार ५१० रुपयांची देयके काढण्यात आली. अपहारानंतर झालेल्या बैठकांमध्ये या देयकांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण नाचणकर करीत आहेत.