लोकसत्ता टीम

नागपूर: राज्यातील अनेक छोट्या शहरातील नाट्यगृहाची अवस्था चांगली नाही.’ आई तुला कुठे ठेवू ग’ या नाटकाच्या वेळी तर एका शहरामध्ये नाटकातील कलावंताना नाट्यगृहाचे कुलुप उघडावे लागले होते. त्यामुळे कलावंताना नाटक करताना अशा नाट्यगृहांमध्ये फारच त्रास होतो अशी खंत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केली.

चार चौघी नाटकाच्या निमित्ताने हट्टगडी नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमाशी बोलत होत्या. करोनानंतर राज्यातील व्यवसायिक नाटकांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र राज्यातील नाट्यगृह चांगली नसतील तर त्याचा कलावंताना आणि रसिकांना सुद्धा त्रास होतो. नाट्यगृहातील वातानुकुलित व्यवस्था आठ आठ दिवस बंद राहते. मुळात नाट्यगृहांची देखभाल करण्याची जबाबदारी त्या व्यवस्थापनाची असते. त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.

हेही वाचा… वीजेची मागणी २७ हजार मेगावॅटवर; राज्यात वीज निर्मिती किती?

सभागृह स्वच्छ असले पाहिजे. उन्हाळ्यामध्ये वातानुकुलीत व्यवस्था चांगली असावी, स्वच्छता गृह आणि मेकअप रूम स्वच्छ असली पाहिजे. मात्र नाट्य गृह व्यवस्थापन नाट्यकलावंताना आणि रसिकांना गृहित धरतात आणि काहीच करीत नाही. नाट्यगृहात वातानुकुलित व्यवस्था नसेल तर ती आमची जबाबदारी नाही मात्र रसिक नाट्य प्रयोगाला आले की कलावंताशी वाद घालतात. सभागृहाच्या व्यवस्थापनाला काहीच बोलत नाही. खरे तर नाट्य रसिकांनी नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल बोलण्याची गरज आहे असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा… नागपूर: सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचे काम सुरू

काही नाट्यगृह चांगली आहे मात्र विशेषत: छोट्या शहरातील नाट्यगृहाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नवीन कार्यकारिणी निवडून आली आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले नाट्यगृहाच्या दूरव्यवस्थेबाबत अनेकदा बोलले आहे त्यामुळे त्यांनी आता याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे असेही हट्टगंडी म्हणाल्या. नवीन कलावंता सोबत काम करताना खूप काही शिकायला मिळत असते. शिवाय त्यांच्यासोबत काम करण्याचा वेगळा आनंद सुद्धा घेत असते. आज माध्यम वाढली असली तरी नवीन कलावंताना या क्षेत्रात संघर्ष करावा लागतो, असेही त्या म्हणाल्या.

Story img Loader