नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आल्यावर हिंदू राष्ट्राची संकल्पना पुनरुज्जीवित झाल्याचे दिसून येत आहे. याच हिंदू राष्ट्र भावनेने नाथूराम गोडसेला महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी प्रेरित केले, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व संशोधक धीरेंद्र के. झा यांनी केली.पीस या संस्थेच्या वतीने ‘गांधी असॅसिन-द मेकिंग ऑफ नाथुराम गोडसे अँड हिज आयडिया ऑफ इंडिया’ या विषयावर विनोबा विचार केंद्र, धरमपेठ येथे त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा >>> अमरावती : ‘नवनीत राणा जात प्रमाणपत्रावर का बोलत नाहीत? सुषमा अंधारे यांचा सवाल

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Sharad Pawar
कच्चथिवू बेटावरून शरद पवारांचा मोदींवर पलटवार, म्हणाले, “हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर…”

अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यता सेनानी लीलाताई चितळे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्याम पांढरीपांडे उपस्थित होते.यावेळी झा म्हणाले, उपलब्ध सर्व नोंदी तपासल्यास दिसून येते की, भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी जवळसपास २५ वर्षांपासून स्वतंत्र भारत कसा असेल याविषयीच्या दोन संकल्पना मांडण्यात येत होत्या. काही लोकांना धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र हवे होते तर काहींना हिंदू राष्ट्र हवे होते. या दोन संकल्पनांमध्ये द्वंद इतका वाढला की त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न हताश झालेल्या लोकांनी महात्मा गांधी यांची हत्या करून केला. महात्मा गांधी राष्ट्र निर्माण प्रक्रियेच्या प्रमुख भूमिकेत होते. ते हिंदू राष्ट्राच्या निर्मितीमध्ये अडथळा ठरू नयेत म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.

हेही वाचा >>> “अतिरिक्त ‘वर्कलोड’मुळे गृहमंत्री म्हणून फडणवीस कुचकामी”, सुषमा अंधारेंचं विधान; म्हणाल्या, “बच्चू कडूंना…”

गांधी हत्येनंतर हा संघर्ष थांबला. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन झाल्याचे दिसून येत आहे. गोडसेला गांधी हत्येसाठी प्रेरित करणारी हीच हिंदू राष्ट्र भावना होती.गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. त्याने फाशीवर जाण्यापूर्वी ‘नमस्ते सदा वत्सले’ या संघाच्या प्रार्थनातील पहिले कडवे गायले होते. याशिवाय अनेक पुरावे उपलब्ध आहेत. परंतु त्याने न्यायालयात स्वयंसेवक संघाशी त्याचे संबंध नाकारले. वास्तविक हे खोटे होते. याच जबानीचा आधार घेऊन संघ गोडसे पासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहे, असा दावाही झा यांनी केला.