राजेश्वर ठाकरे

नागपूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत सोमवारी सरकारकडून मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विनंतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. ते आल्यानंतर त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे विधानसभेत सांगितले.

Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
Vijay Shivtare
मुख्यमंत्र्याचं ऐकलं नाही, पण ओएसडींच्या फोननंतर शिवतारे नरमले; माघार घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. गेल्या आठवडय़ात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभा अध्यक्षांनी चालू अधिवेशन काळासाठी निलंबित केले होते. त्यासंदर्भात आज प्रश्नोत्तराच्या तासांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जयंत पाटील या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य आहेत. गेल्या आठवडय़ात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सभागृहात अशाप्रकारचे अनेक प्रसंग घडतात. त्यावेळी आपण सामंजस्याने मार्ग काढत असतो. जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती मी करत आहे. तुम्ही मनात आणले तर काहीही होऊ शकते. हे आम्हा सर्वाना माहीत आहे. तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून पाटील यांच्यावरील कारवाई मागे घ्याल असे मला वाटते, असे पवार म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री सध्या सभागृहात उपस्थित नाहीत. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी उत्तर दिले.

..तर उपमुख्यमंत्र्यांनाच परवानगी मागावी लागेल – जाधव

 प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भावना व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री बोलण्यास उठले. तेव्हा भास्कर जाधव यांनी बोलू देण्याची विनंती केली. अध्यक्षांनी त्यास नकार दिला. त्यात फडणवीस यांनी जाधव यांना बोलू देण्याची विनंती अध्यक्षांना केली. त्यावर जाधव यांनी उपमुख्यमंत्र्यांनी म्हटल्यावरच बोलू दिले जात असेल तर त्यांच्याकडे यापुढे परवानगी मागेल, असा टोला लगावला. त्यावर अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज नियमाने चालते, असे सांगितले.