Servant threatens woman to spread obscene photo on social media police crime | Loksatta

नोकराने महिलेस दिली अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी

आरोपी राहुल हा अविवाहित असून गेल्या अनेक वर्षांपासून एका व्यावसायिकाकडे नोकर म्हणून काम करीत होता.

नोकराने महिलेस दिली अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी
( संग्रहित छायचित्र )

नागपूर : प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेला अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या नोकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल (३०) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल हा अविवाहित असून गेल्या अनेक वर्षांपासून एका व्यावसायिकाकडे नोकर म्हणून काम करीत होता. मालकासा कांदे-बटाटे विक्री करण्यास मदत करीत होता. मालकाने त्याला वाहन चालवण्याचा परवाना काढून दिला. तेंव्हापासून तो मालकाची कार चालवायला लागला.

मालकाच्या ३८ वर्षीय पत्नीला वारंवार माहेरी सोडणे किंवा नातेवाईकांकडे घेऊन जाण्याची जबाबदारी राहुलकडे होती. तसेच तो मालकाच्या घरीही काम करीत होता. त्यामुळे मालकाच्या पत्नीशी ओळख झाली. व्यवसायानिमित्त मालक बाहेरगावी राहत असल्यामुळे राहुलला घरी मुक्कामी राहावे लागत होते. यादरम्यान राहुल आणि मालकाच्या पत्नीची जवळिक वाढली. मालक घरी नसल्यानंतर दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होते. राहुलने मोबाईलने महिलेचे काही अश्लील फोटो आणि चित्रफित काढल्या होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी दोघेही महिलेच्या मुलाला एका खोलीत बसून दिसले.

हेही वाचा : लहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर

त्यामुळे मुलाने आईची समजूत घालून राहुलला कामावरून काढून टाकून मैत्री तोडण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून राहुलला कामावरून काढून टाकण्यात आले.महिलेने प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे राहुल चिडला होता. त्यामुळे तो वारंवार तिला भेटत होता. तिला पूर्वीप्रमाणे संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र, ती त्याला नकार देत होता. त्यामुळे राहुलने तिला अश्लील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर

संबंधित बातम्या

‘हॅलो, तुमच्यावर असलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर चर्चा सुरू आहे…’; खंडणीसाठी धवनकर कुलगुरू कक्षातून करायचे संपर्क
‘भारत जोडो’ महाराष्ट्रात यशस्वी, पण ‘नेते जोडो’त काँग्रेस अपयशी; माजी मंत्री लवकरच भाजपमध्ये जाणार
…तर हजारो विद्यार्थी पोलीस भरतीला मुकणार
‘नितीन गडकरी हे स्पायडर मॅन’; आसामचे कृषीमंत्री टागे टाकी
महिलेने कानशिलात हाणल्यानंतरही प्रा. धवनकरची मग्रुरी कायम; खंडणी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरील नव्या वादात जितेंद्र आव्हाड यांची उडी, म्हणाले “मुस्लीमविरोधी काश्मीर फाईल्स…”
Amritsar : पाकिस्तानातून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या ड्रोनवर सीमा सुरक्षा दलाचा गोळीबार
गोखले पूल हलक्या वाहनांसाठी सुरू होण्याची शक्यता धूसर
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांचा शिमला-मनालीमध्ये लेकीसह भन्नाट डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
“ते त्यांचं वैयक्तिक…” लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’बाबत केलेल्या वक्तव्यावर IFFI च्या ज्युरींची स्पष्ट भूमिका