scorecardresearch

Premium

नागपूर: ‘सेक्स रॅकेट‘ उघडकीस, ग्राहकांकडून घ्यायचे ४ ते ५ हजार रुपये…

पारशिवनीजवळील नयाकुंड परिसरात असलेल्या ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंट आणि लॉजिंग येथे सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट‘वर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला.

sex-racket
पारशिवनीजवळील नयाकुंड परिसरात असलेल्या ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंट आणि लॉजिंग येथे सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट‘वर ग्रामीण पोलिसांनी छापा

पारशिवनीजवळील नयाकुंड परिसरात असलेल्या ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंट आणि लॉजिंग येथे सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट‘वर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला आंबटशौकीन ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थिनीकडून देहव्यवसाय करवून घेणाऱ्या रेस्ट्रॉरेंटच्या व्यवस्थापक आणि सहायकाला पोलिसांनी अटक केली. शुभम कारेमोरे (३०, सावनेर) आणि सुनील चंद्रभान मेश्राम (४०, उमेरड बायपास, सावनेर) अशी दलालांची नावे आहेत.

हेही वाचा >>>भंडारा : भरधाव ट्रेलरच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

सुनील मेश्राम हा ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंटमध्ये व्यवस्थापक होता. या हॉटेलमध्ये अनेक आंबटशौकीन ग्राहक येत होते. पार्टी करण्यासाठी वारंवार तरुणींची मागणी करीत होते. त्यामुळे शुभम कारेमोरे याने झटपट पैसा कमविण्यासाठी तरुणींचा शोध घेतला. पाच तरुणी देहव्यापारासाठी तयार झाल्या. त्या तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षणासाठी पैसा लागत असल्यामुळे त्या देहव्यवसाय करण्यासाठी तयार झाल्या. तरुणींना शुभमने प्रतिग्राहक ५०० रुपये असा सौदा ठरवला. शुभम आणि सुनील हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांकडून ४ ते ५ हजार रुपये घेत होता.

हेही वाचा >>>बचतगटांसाठी ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ उभारणार; शाहू परिवाराचे संदीप शेळके यांची घोषणा

हॉटेलमध्ये तरुणींची ये-जा वाढल्यामुळे अनेक आंबटशौकीन शनिवारी-रविवारी पार्टीसाठी येत होते. ही माहिती पोलीस उपाधीक्षक राजेंद्र निकम यांना मिळाली. त्यांनी बोगस ग्राहक पाठवला. शुभमने बनावट ग्राहकाशी ५ हजारांत सौदा केला. तरुणीला ठेवलेल्या खोलीत त्या ग्राहकाला पाठवण्यात आले. काही वेळातच ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी लगेच छापा घालून तरुणीला ताब्यात घेतले. तर तिच्याकडून देहव्यापार करवून घेण्याऱ्या सुनील आणि शुभमला अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवित असल्याची कबुली आरोपींनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sex racket in dreamvilla family restaurant in nayakund area near parshivani adk 83 amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×