नागपूर : नराधम बापाकडून लैंगिक शोषण, घरातून पळून प्रियकरासोबत लग्न, गर्भपातासाठी दवाखान्यात गेल्यावर..

मुलीचे बापाने वारंवार लैंगिक शोषण केले. बापाच्या तावडीतून तिची सुटका व्हावी म्हणून प्रियकराने तिला पळवून नेले. मात्र, दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या प्रेयसीने आता प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिली.

Sexual abuse girl Nagpur district
नागपूर : नराधम बापाकडून लैंगिक शोषण, घरातून पळून प्रियकरासोबत लग्न, गर्भपातासाठी दवाखान्यात गेल्यावर.. (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : पंधरा वर्षांच्या मुलीचे बापाने वारंवार लैंगिक शोषण केले. बापाच्या तावडीतून तिची सुटका व्हावी म्हणून प्रियकराने तिला पळवून नेले. मात्र, दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या प्रेयसीने आता प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिली. त्यामुळे वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली. कैलास राजकुमार अडमाचे (२५, आठवा मैल, वाडी) असे आरोपीचे नाव आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा – गोंदिया : ट्रकने मुलाला चिरडले, संतप्त जमावाने ट्रक पेटवला; परिसरात तणाव

हेही वाच – राजकीय नेत्यांचे वक्तव्य अज्ञानातून, न्यायालयाच्या ताशेऱ्यांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी टिना (काल्पनिक नाव) ही दहावीत असतानाच तिच्या दारुड्या बापाची वाईट नजर तिच्यावर पडली. घरी कुणी नसताना बापाने तिच्यावर वारंवार लैंगिक शोषण करणे सुरू केले. बापाच्या अत्याचाराला ती कंटाळली होती. यादरम्यान, तिचे गावातील कैलास अडमाचे या तरुणाशी सूत जुळले. ती कैलाससोबत पळून नागपुरात आली. दरम्यान, ती गर्भवती झाल्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या. गवंडी काम करणाऱ्या कैलासने लग्न न करताच वडील म्हणून बाळाला नाव दिले. सध्या टिना १७ वर्षांची असून ती पुन्हा गर्भवती झाली. तिने गर्भपात करण्याचे ठरवले. मात्र, डॉक्टरांनी तिचे आधारकार्ड तपासले असता ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून कैलासविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 09:32 IST
Next Story
नागपूर : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची विक्री; बऱ्याच औषध दुकानदारांकडून नियम धाब्यावर
Exit mobile version