नागपूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन महिन्यांची गर्भवती ; प्रियकराविरुद्ध गुन्हा | Sexual abuse of a minor girl nagpur amy 95 | Loksatta

नागपूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन महिन्यांची गर्भवती ; प्रियकराविरुद्ध गुन्हा

एका अल्पवयीन मुलीचे युवकाने छत्तीसगडमधून अपहरण करून नागपुरात आणले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

नागपूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन महिन्यांची गर्भवती ; प्रियकराविरुद्ध गुन्हा
( संग्रहित छायचित्र )

एका अल्पवयीन मुलीचे युवकाने छत्तीसगडमधून अपहरण करून नागपुरात आणले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती झाली.
पोट दुखत असल्यामुळे मुलीला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांच्या वरील बाब निदर्शनास आली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी योगेश नायडू निषाद (२३) दनिया धमदा, जि. दुर्ग (छत्तीसगड) यास अटक केली.

२ नोव्हेंबर २०२० मध्ये योगेश निषाद याने त्याच्याच गावी राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नागपूरला आणले होते. तिला हिंगणा हद्दीत वागदरा येथे भाड्याच्या खोलीत ठेवण्यात आले. योगेशने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान गावात दोघांची बदनामी झाली. पण मुलगी गावी आईवडिलांच्या भीतीपोटी गावी परत जाण्यास तयार नव्हती.

सोमवारी सकाळी तिच्या पोटात दुखत असल्यामुळे योगेशने तिला तपासणीसाठी रुग्णालयात नेले. तेथे ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तिचे अल्पवय पाहता डॉक्टरांनी तत्काळ ही माहिती हिंगणा पोलिसांना दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून योगेश यास अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गोंदियाजवळ एक्स्प्रेस मालगाडीवर आदळली ; तीन प्रवासी जखमी, उपचार सुरू

संबंधित बातम्या

राज्यकर्ते कोणीही असो, ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या थांबतील …; काय म्हणाले नाना पाटेकर
नागपूर: ‘त्या’ चालकांवर कारवाईबाबत ‘एसटी’ महामंडळ गोंधळलेले!
दुर्दैवी ! ताडोबात वाघांच्या चार बछड्यांचा मृत्यू; मोठ्या वाघाने केला हल्ला की…
ताडोबातील सर्वात वयोवृद्ध वाघडोह वाघाचा मृत्यू
‘इच्छुकांनी गर्दी करु नये’… भाजपावाल्यांसाठी व्यापाऱ्यांनी लावलेला बॅनर नागपूरमध्ये ठरतोय चर्चेचा विषय; जाणून घ्या प्रकरण काय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?” पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले
विश्लेषण : राज्य सरकारची ई – ऑफिस प्रणाली काय आहे? त्यामुळे लोकांची कामे वेळेत होणार का?
जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
“त्याच्या चाळीतल्या…” समीर चौगुलेंनी दत्तू मोरेच्या चाळीबद्दल केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य