चंद्रपूर : चंद्रपूर येथील वीज केंद्रातील विजय एंटरप्रायझेस या कंपनीच्या पर्यवेक्षकाने प्लांटमध्ये ६ महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी तक्रार झाल्यानंतरही पोलिसांनी दीड महिन्यापासून गुन्हा दाखल केला नाही. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करताच सभापती नीलम गोऱ्हे यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

गेल्या ५  फेब्रुवारी २०२३ रोजी, चंद्रपूर वीज केंद्राच्या सफाई कर्मचार्‍यांचे कंत्राट हाताळणार्‍या पर्यवेक्षकाने प्लांटमध्ये ६ महिला कर्मचार्‍यांवर लैंगिक अत्याचार केले. पीडित महिलांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली, मात्र दीड महिना उलटूनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. विजय एंटरप्रायझेस या कंत्राटी कंपनीचे पर्यवेक्षक मुरारी समुद्रवार यांनी महिला सफाई कर्मचाऱ्यांना सोबत झोपन्यास सांगितले.. वेश्या असल्याच्या गंभीर आरोपासोबतच जातीवाचक गलिच्छ शिव्या देण्यात आल्या. त्याच्या या कृत्याने दुखावलेल्या पीडित महिलांनी तक्रार देण्यासाठी दुर्गापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. मात्र, दीड महिन्यानंतरही पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. ही बाब शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या लक्षात येताच त्यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करून योग्य कारवाईची मागणी केली. त्यावर उपाध्यक्ष नीलम गोरे यांनी पोलिसांना कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

Prime Minister Narendra Modi slams congress over development
‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
gondia lok sabha constituency, NCP s Praful Patel, Praful Patel Family Cast Votes, Gondia , Gondia Polling Station Disorder, gondia polling news, polling day, polling news, lok sabha 2024, election 2024, gondia news,
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क; मतदान केंद्रावरील अव्यवस्था पाहून…
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप