बुलढाणा : धन्य आज दिन संत दर्शनाचा.. श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांवच्या वतीने श्रींच्या १४८ प्रगटदिन उत्सवा करिता श्री चे मंदिर दर्शनसाठी दोन दिवस खुले राहणार आहे यामुळे भाविक भक्तांची मोठी अडचण दूर झाली असून श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेता येणार आहे.

श्रींच्या प्रगटदिन महोत्सवानिमित्त गेल्या सात दिवसापासून मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या सप्ताहामध्ये राज्यातील भजनी दिंड्या शेगाव येथे दाखल होत आहे. भजनी दिंड्यांमधील वारकरी भाविकांनी श्रीच्या समाधी मंदिराचे दर्शनासाठी ७ व ८ फेब्रुवारी रोजी श्रींच्या दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुले राहिलं.

श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून शेगावच्या संत गजानन महाराज संस्थान च्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.. त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन आपल्या गावी परत जाणार आहे. उद्या ८ फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राज्य भरातील भजनी दिंड्या, शेगाव नगरीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दिंड्या सोबत येणाऱ्या हजारो वारकरी, भाविकांची निवास, भोजन व्यवस्था संस्थान कडून करण्यात आली आहे.

तसेच प्रकट दिनानिमित्त राज्यातून येणाऱ्या हजारो भाविकासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. संस्थान चे सेवेकरी मोठ्या संख्येने नियुक्त करण्यात आले असून भाविकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. होणारी मोठी गर्दी लक्षात घेता पोलीस विभागातर्फे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संत नगरीत आबालवृद्ध भाविकांची मोठी गर्दी उसळली असून उद्या रविवारी हा आकडा लाखावार जाईल असा अंदाज आहे.