बुलढाणा : राज्यात यावर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाने मोठी ओढ दिली असून संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शेगांव येथील गजानन महाराज संस्थान नेहमीप्रमाणे पुढे आले आहे.संस्थानच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहायता निधीस’ १ कोटी ११ लाख रुपयांचा भरीव सहयोग निधी सुपूर्द करण्यात आला आहे.गजानन महाराज संस्थान, शेगांवच्या वतीने २७ सप्टेंबर २०२६ रोजी, हा १ कोटी ११ लाख रुपयांचा मदत निधी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुपूर्द करण्यात आला.
जोपासली सामाजिक बांधिलकी
गजानन महाराज संस्थान हे केवळ धार्मिक केंद्र नसून सामाजिक बांधिलकी जपणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. यापूर्वीही राज्यावर आलेल्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत संस्थानने नेहमीच मदत केली आहे.याही वेळी राज्यातील दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आणि शासकीय पातळीवरील मदतकार्याला बळ देण्यासाठी श्री संस्थानने तात्काळ हा निर्णय घेतला.२०१९ व २०२५ मघ्ये सुद्धा संस्थान कडून राज्यातील पुरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळीस सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीस’ सहयोग देण्यात आला होता.
