चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष प्रचंड वाढला आहे. यात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मूल शहरालगत सोमनाथ मार्गावरील शेतशिवारात आज पहाटे वाघाने हल्ला केल्याने मेंढपाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. मल्लाजी येगावार (६८) असे मृत मेंढपाळाचे नाव असून तो मूल येथील कुरमार परिसरातील रहिवासी होता.

गणेश कावळे यांच्या शेताजवळ ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात वाघाने एका मेंढपाळाचा बळी घेतला होता. यानंतर वाघाने आणखी एका मेंढपाळाचा बळी घेतल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.