नागपूर विधानभवन परिसरातील शिवसेना पक्ष कार्यालयावरून विधिमंडळ अधिवेशनादरम्यान शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. सध्यातरी प्रशासनाने या कार्यालयावर पडदा टाकून तात्पुरता मार्ग काढला आहे. विधान भवनात सर्व प्रमुख राजकीय पक्षांना कार्यालयासाठी जागा दिली जाते. नागपुरात भाजप विधिमंडळ कार्यालयाच्या बाजूला शिवसेनेचे कार्यालय आहे. पण, शिवसेना उद्धव व शिंदे अशा दोन गटांत विभागली गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या कार्यालयावर हक्क सांगण्यावरून दोन्ही गटात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकरिता विधानभवन परिसरात रंगरंगोटीसह विविध कामे सुरू आहेत. त्यात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांचाही समावेश आहे. शिवसेना पक्ष कार्यालयाचा फलक मात्र कापड टाकून झाकण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group and the thackeray group are likely to contest for office during the winter session at nagpur tmb 01
First published on: 30-11-2022 at 09:38 IST