अमरावती: आपल्याला जो व्यक्ती, ज्याचे विचार पटत नाही, त्याच्यावर शाई फेकू नका, मग तो कोणताही राजकारणी असो. ती शाई फेकल्यापेक्षा गोळा करा आणि मतदानाच्या वेळी तीच बोटावर लावून निवडणुकीच्या काळात त्या शाईची किंमत त्यांना दाखवून द्या. जेणेकरून त्यानंतर त्याला बोलण्यासाठी संधीच मिळणार नाही. रक्ताचा थेंब न सांडवता परिवर्तन करा, लोकशाहीचा लढा असाच असला पाहिजे, कारण तुमची आमची ही ताकद मतपत्रिकेतून दाखवा, असे मत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>>नागपूर: परीक्षेचा ताण नको, रोजगाराचे शेकडो पर्याय उपलब्ध! तज्ज्ञ डॉ. मंजूषा गिरी व डॉ. प्रवीण डहाके यांचे आवाहन
चांदूर रेल्वे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीद्वारे आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमात सोमवारी रात्री त्या बोलत होत्या. आज शिवाजी महाराज असते तर आजही गद्दारांचा कडेलोट केला असता, असा उल्लेख करून आज लीडर कमी आणि डीलर जास्त झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा >>>छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमात अनिल बोंडेंनी वक्त्याला म्हटले ‘मुर्ख आहेस का?’ त्यानंतर झाले असे की…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रा येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. मात्र ज्यावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांबद्दल अवमानकारक भाष्य केले, त्यावेळी ते शांत होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारींचा निषेध करणारा एक ठरावही विधानसभेत मांडला नाही, यावरून शिंदे आणि भाजप यांची भूमिका लक्षात येते, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. ‘कर लो दुनिया मुट्ठी में’ म्हणत १३० कोटी जनता अदानी, अंबानींच्या मुठीत दिली आहे. तुम्ही विकासाचे मुद्दे मांडा ते तुम्हाला मंदिर सांगतील, तुम्ही महागाई विचारा ते जातीय भांडणे लावतील, आज बौद्धिक क्षमतेनुसार नाही तर निवडक मित्रांना पदे दिली जात आहेत, असाही आरोप यावेळी त्यांनी केला.
हेही वाचा >>>नागपूर : धक्कादायक! रेल्वेतून दारू तस्करीसाठी आता महिलांचा वापर, वाचा…
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची गळाभेट घेण्यासाठी मी पुन्हा अमरावतीत येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, डॉ. तुकाराम भस्मे, बाळासाहेब भागवत, बाळासाहेब हिंगणीकर, डॉ. ठाकूर, जयंतराव देशमुख, डॉ. सागर वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.