scorecardresearch

शिवसेनेच्या नादी लागाल तर याद राखा – राऊत 

मातोश्री आणि शिवसेनेच्या नादाला लागू नका, अन्यथा २० फूट जमिनीखाली गाडण्यात येईल.

नागपूर : मातोश्री आणि शिवसेनेच्या नादाला लागू नका, अन्यथा २० फूट जमिनीखाली गाडण्यात येईल. शिवसेनेला अंगावर घेण्याऱ्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावे, अशा भाषेत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज राणा दाम्पत्यासह भाजपला इशारा दिला. राणा दाम्पत्याच्या खेळीमागे भाजपचाच हात असल्याचा आरोप केला. खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा महाराष्ट्राचे शत्रू असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या मागे उभे राहतात. एवढं प्रेम उतू चालले, असा टोलाही त्यांनी लगावला. नवनीत राणा यांचा हिंदुत्वाचा काय संबंध? अयोध्या आंदोलन, श्रीरामाचं नाव घ्यायला त्यांचा विरोध होता. या बोगस हिंदुत्ववादी लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजप आपला डाव साधून राज्यातील वातावरण दूषित करीत आहे. 

राष्ट्रपती राजवट कशी लागते, हे आम्हाला माहिती आहे. पहाटे शपथविधी घेऊन राष्ट्रपती राजवट उठवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. कायदा कुणाला शिकवायचा असेल तर राज्यपाल यांना शिकवा, असा टोला हाणत राज्यपाल गेल्या अडीच वर्षांपासून महत्त्वाच्या फाइल्सवर बसले आहेत, असेही ते  म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena matoshri sanjay raut warning bjp rana couple ysh

ताज्या बातम्या