scorecardresearch

अकोला : शिवसेना ठाकरे गटाच्या महानगराध्यक्षावर जमिनीच्या वादातून हल्ला; दोन गटात हाणामारी

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच ते सहा लोकांना ताब्यात घेतले आहे.

अकोला : शिवसेना ठाकरे गटाच्या महानगराध्यक्षावर जमिनीच्या वादातून हल्ला; दोन गटात हाणामारी
शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा

शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्यावर जमिनीच्या वादावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोन गटात हाणामारीही झाली. राजेश मिश्रा यांना गंभीर दुखापत झाली, तर विरोधी गटातील काही जण जखमी झाले.  

हेही वाचा >>> नागपूर : सावत्र आई रागावली त्यामुळे १३ वर्षीय मुलाचे थेट सायकल काढली अन् पुढे…

शहरातील हरिहर पेठ भागात रविवारी दोन गटात हाणामारी झाली. जुने शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा आणि प्रवीण अहीर गटात जमिनीच्या वादातून हाणामारी झाली. यात राजेश मिश्रा यांच्या नाकाला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असून अन्य एक जण जखमी झाला आहे. अहीर गटातील दोन ते तीन लोक जखमी झालेत. हाणामारीत पोलीस हवालदार शेख रशीद यांच्या डोक्यावर लाठी बसली, तर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचा चष्माही तुटला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा >>> नागपूर: मुंबई महापालिकेच्या करोना खर्चाची चौकशी करा : आ. कोटेचा

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच ते सहा लोकांना ताब्यात घेतले आहे. मिश्रा यांनी २०१९ मध्ये हरिहर पेठ येथील जागा विकत घेतली. त्यावर कुटुंब भाड्याने राहत होते. त्या जागेवर न्यायालयाच्या आदेशाने मिश्रा यांना ताबा मिळाला. या प्रकरणावरून मिश्रा व अहीर कुटुंबात वाद आहे. या वादाचे पर्यवसान आज हाणामारीत झाले. प्रवीण अहीर, कमलेश अहीर, सचिन अहीर, विजय अहीर आणि त्यांची आई शांता अहीर यांनी संगनमत करून शिवीगाळ करून जीवाने मारण्याच्या उद्देशाने तलवारीने वार केल्याची तक्रार मिश्रा यांनी दिली, तर अहीर कुटुंबानेदेखील मिश्राविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 19:22 IST

संबंधित बातम्या